शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची३४वी बैठक संपन्न

 शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची ३४वी  बैठक संपन्न 



मूल दीपक देशपांडे.

कृषी  महाविद्यालय मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची चौतीसवी बैठक दिनांक २४/०९/२०२५ बुधवार रोजी सायंकाळी ६.०० वाजता मौजा मरेगाव ता. मूल जि. चंद्रपूर  येथे  महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या प्रसंगी मरेगाव येथील सरपंच सौ. ज्योत्सना पेन्दोर, श्री.पुंडलिक जवादे  जागृत ग्राहक राजा मूल तालुका सदस्य तथा पोलीस पाटील मरेगाव, शेतकरी बांधव तसेच कृषि महाविद्यालय, मूल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यत्वे ने धान व कापूस पिकातील एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी डॉ. व्ही. जी. अतकरे, सहयोगी अधिष्ठाता कृषि महाविद्यालय, मूल यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व धान पिकांसाठी कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच शेती बरोबर शेती संलग्न व्यवसाय जसे गांडूळ खत निर्मिती व वर्मिवाश तयार करून आपल्या आर्थिक मिळकती मध्ये भर पाडावी तसेच शेतकऱ्यांनी शेती हा एक व्यवसाय म्हणून करावा, असे शेतकऱ्यांना सांगितले. डॉ. आर. पी. गजभिये, सहयोगी प्राध्यापक,उद्यानविद्या यांनी हवामानातील  बदलत्या परिस्थितीत पारंपारिक पिक असलेल्या धान पिकासोबत शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची लागवड करावी तसेच भविष्यातील शाश्वत उत्पादनाचे साधन म्हणून धानाच्या बांध्यावर फणस पिकाची लागवड करण्यासाठी मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले. 

धान व कापूस पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन बाबत उपस्थित किटकशास्त्र विषयाचे शास्त्रज्ञ डॉ. भूषण ठाकरे यांनी माहिती दिली. धान व कापूस पिकातील एकात्मिक रोग व्यवस्थापन करतांना शेतकऱ्यांनी रोगांच्या प्रादुर्भावाची पातळी लक्ष्यात घेऊन योग्य प्रमाणात व योग्य वेळी विषयतज्ञाच्या मागर्दर्शनानुसार बुरशीनाशकाच्या वापर करावा असे आवाहन डॉ. गीतांशु डिंकवार, वनस्पती रोगशास्त्र विषयतज्ञ यांनी केले.

सतत धान पिकाची लागवडी करत असल्यामुळे धान पिकाचे उत्पादन कमी मिळत असल्यामुळे अधिक उत्पादनासाठी शेतकरी रासायनिक खताच्या अतिरिक्त वापर करत आहे, याकरिता माती परीक्षणानुसार खतांचे नियोजन करण्याबाबत डॉ. अक्षय इंगोले यांनी मार्गदर्शन केले. 

कापूस पिकातील व्यवस्थापन करतांना आंतर मशागत व अन्नद्रव्य तसेच लाल्या रोगाचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापनबाबत डॉ. स्वप्नील ठाकरे, कृषिविद्या विषयतज्ञ यांनी मार्गदर्शन केले. 

पिक लागवडीच्या वेळी किड व रोगास प्रतिकारक्षम वाणाची निवड केल्यास पिक व्यापास्थापन करतांना त्यावर होणारा अधिकच्या खर्चात बचत करता येऊ शकते असे डॉ सुवर्णा नगराळे, कृषि वनस्पतीशास्त्रज्ञ यांनी सागितले. सदर कार्यक्रमात उपस्थितीत शेतकऱ्यांनी सध्यास्थितीत लागवड (धान, कापूस, तूर इत्यादी.) सदर कार्यक्रम दरम्यान केलेल्या पिकांच्या समस्याबाबत विविध प्रश्न उपस्थितीत केलेल्या त्याबाबत कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञ मंडळीनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे निरकरण केले.

सदर कार्यक्रमास एकुण २५ शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषिविद्या विषयतज्ञ श्री. देवानंद कुसुंबे यांनी केले व उपस्थितांचे आभार डॉ सुवर्णा नगराळे यांनी मानले.  

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

    ✍️Ddbatmi-m2M✍️

                                                                                                                       

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.