दिनविशेष. गणरायाला सानंद निरोपाची अनंत चतुर्दशी

दिनविशेष.

 गणरायाला सानंद निरोपाची  अनंत चतुर्दशी 

       *🔆ॐ गं गणपतेय नमः🔆*

    *सर्वं जगदिदं त्वत्तो जायते ।*

    *सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति ।*

    *सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति ।*

    *सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति ।*

    *त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ: ।*

    *त्वं चत्वारिकाकूपदानि ॥*

        *हे गणराया, हे सर्व जग तुझ्यामुळे उत्पन्न होते.. स्थिर राहते आणि तुलाच येवून मिळते. तूं पृथ्वी, अग्नी, आप, तेज, वायु, आकाश आहेस. तूच परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी वाणीची रुपे आहेस. तूं त्रिगुणाच्या.. देहत्रयाच्या, जागृतावस्था.. स्वप्नावस्था.. सुषुप्तावस्थेच्या तसेच तिन्ही काळाच्या पलिकडे आहेस.*

        *लोकमान्यांच्या दूरदृष्टीचा हा सार्वजनिक उत्सव मनामनात आनंद निर्माण करणारा ठरला. दिवस कसा संपायचा ते कळतच नव्हते. एकीकडे आरती.. गणेश स्तोत्र.. अथर्वशीर्ष पठन भक्ती तर दुसरीकडे विविध कलांचे सादरीकरण. श्रीमंत.. गरीब भेद नव्हता. खेडेगाव ते महानगरे यामधील बालगोपाल ते आजोबा सगळ्यांनी थक्क करणारे सुप्त गुणाचे प्रदर्शन केले.*

        *या कलोत्सवात हजारोंना आपले अविष्कार दाखवता आले. हजारो कलावंतांच्या नवनवीन कलांचे अविष्कार लोकांना सुखावणारे ठरले. तसेच नवनविन कलावंत लाभणार. कलेचा आस्वाद घेत जीवन आनंदी करण्याची गुरुकिल्ली  सापडणारे रसिक निर्माण होणार.*

        *गणेशोत्सवाची आज सानंद सांगता. हा उत्सव यशस्वी व्हावा म्हणून गल्लीबोळातील कार्यकर्ते आपला अमूल्य वेळ खर्चून निरपेक्षपणे परिश्रम करत होते, या यशस्वीतेचे मोठे श्रेय आहे. हा गणेशोत्सव आनंदी व्हावा म्हणून कार्य करणाऱ्या सर्व यंत्रणातील सर्वांप्रति विनम्र कृतज्ञता व्यक्त करुया.*

        *श्री गणेशाचे अवतार.. अस्तित्व चारही युगात आहे. आज केवळ पार्थिव गणेश मूर्तीचे विसर्जन होणार. जीवनात षड्रिपू विजयाने प्रेमाने जगा हा संदेश देणारे हे आजचे विसर्जन. कलीयुगात श्री गणेशाचा धुम्रकेतू अवतार होणार आहे असे पुराण सांगते.*

        *आज हा उत्सव सानंद संपन्न होत आहे ही संकटमोचक गणरायाची कृपा. हे गणेशा, तूझ्यावरची आमची अढळ निष्ठा.. श्रद्धा वृद्धिंगत होत राहो. यामुळेच आम्हाला जीवनात सुख.. समृद्धी.. आनंद प्राप्त होणार आहे.*

    *एक दोन तीन चार....*

    *गणपतीचा जयजयकार....*

        *हाच उत्स्फुर्तपणे जयघोष आज सर्वत्र सुरु आहे. जयजयकार करावा अशी ही ज्ञान देवता.*    

        *"संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे", असाच आनंद.. हेच चैतन्य जीवनात नित्य प्राप्त व्हावे, ही प्रार्थना भक्त विघ्नहर्त्याकडे करणार.* 

        *ऋतं वच्मि ! सत्यं वच्मि ! अर्थातच मी योग्य व सत्य बोलेल.. वागेल हे वचन देणार.*

        *"पूढच्या वर्षी लवकर या" हे मागणे बाप्पाही पूर्ण करणार.* 

*चला तर म्हणू या..*

    *"गणपती बाप्पा मोरया...."* 

    *"पुढच्या वर्षी लवकर या...."* 


  *गजानना गजानना*

  *पार्वतीनंदन गजानना*

  *विघ्नविनाशक एकदंताय*

  *गौरीपुत्रा गजानना*


  *देवांचा तू देव मोरया*

  *गातो तुझे गुणगान*

  *वाट नवी चालाया*

  *दे तू शक्तींचं वरदान*

  *तुजविण न कोणी दयाळा*

  *माझ्या मनीची ठेवी जाण*

  *घेऊनि वसा भक्तीचा*

  *चालू बाप्पा मोरया*

  *बाप्पा मोरया मोरया*

  *एकदंताय मोरया*

  *मोरया मोरया वक्रतुंडाय मोरया*


  *तूच बुद्धीदाता, तूच पाठिराखा*

  *तूच गणाधिशा मोरया*

  *किती विघ्नहर्त्या*

  *तुझी सांग रुपे*

  *तुझी किती नावे मोरया*

  *वर शक्तीचा अन् युक्तीचा*

  *गणराया देई आम्हाला*

  *या घोर तमी लावूनी दिवा*

  *तोडा हो भवपाशाला*

  *बळ सत्कर्मी दे आता*

  *तू बाप्पा मोरया*

  *बाप्पा मोरया मोरया*

  *एकदंताय मोरया*

  *मोरया मोरया* 

  *वक्रतुंडाय मोरया*

  ‼ *गणपती बाप्पा मोरया* ‼

 🚩  *पुढच्या वर्षी लवकर या* 🚩


     संकलन -अभय बक्षी नागपूर.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.