चटावलेल्या मादी बिबटला पकडण्यात वनविभागाला सुयश.
चटावलेल्या मादी बिबटला पकडण्यात वनविभागाला सुयश.
मूल, दीपक देशपांडे.
गुरुवारी सावली वनपरिक्षेत्रातील टेकाडी येथे श्री सुनील गेडाम यांच्या पोल्ट्री फार्म मधे बिबट असल्याची माहिती स्थानिक वनरक्षक यांना मिळाली. या आधी याच बिबट ने गेडाम यांच्या पोल्ट्री फार्म च्या अनेक कोंबड्या मारल्या होत्या. त्यामुळे वनविभागाचे वरीष्ठ अधिकारी यांनी त्या बिबट्याला पकडण्याचा निर्णय घेतला.
चंद्रपूर टी.टी.सी.चे डॉक्टर तथा अतिशीघ्र कृती दल चे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. व त्या बिबट्याला बेशुद्ध करून सुरक्षित पणे पकडण्यात आले.पकडण्यात आलेला बिबट मादि असुन वय जवळपास ९ ते १० महीने आहे..या रेस्क्यु ऑपरेशन दरम्यान वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक श्री वी.एस. तरसे, डॉ.कुंदन पोडचलवार,क्षेत्र सहाय्यक एन.एस.सिडाम, वनरक्षक एस.डब्लू. बोनलवार, अतीशीघ्र कृती दलाचे शुटर मिलिंद कीटे, कीशोर डांगे, मनोज चावरे, अंकीत पडगेलवार, संजीवन पर्यावरण संस्था मूल चे उमेशसिंह झिरे, प्रशांत मुत्यारपवार, तरूण उपाध्ये टेकाडी पी आर टी ची टीम व सहाय्यक वनमजूर उपस्थित होते. यावेळी आजुबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते...
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment