नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा ब्रह्मचारीणी.
नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा ब्रह्मचारीणी.
बेल, धोतरा, रुई
विष्णू पत्नी महालक्ष्मीच्या
करवीरनगरीतून
आजचा रंग लाल ❤️
*दधाना कर मद्माभ्याम अक्षमाला कमण्डलू ।*
*देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा ॥*
आज नवरात्राची दुसरी माळ. आज आदिमायेच्या 'ब्रह्मचारिणी' रूपाचे पूजन होणार. देवीने उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू घेतलेय. भक्ती.. सिद्धी प्राप्त करून देणारी ही देवी.
ब्रह्मचारिणी अर्थात तपस्या, आचरण करणारी देवी. ही दक्ष राजाची कन्या. हिने कठोर तपस्या करून शिवाची प्राप्ती केली. हिच्या पूजनाने तप.. त्याग, वैराग्य, सदाचार, संयम यामध्ये वृद्धी होते. सिद्धी.. विजय प्राप्त होतो. कुंडलीनी शक्ती जागृत होते. खास करुन विद्यार्थी वर्गाला यशासाठी तपस्या शिकवणारी ही देवी. आज ज्या मुलींची लग्न ठरली आहेत अशा कन्यांचे पूजन करुन भोजन.. भेटवस्तू दिल्या जातात.
भारतात हजारो वर्ष जम्मु काश्मिर ते कन्याकुमारी सर्वत्र देवीची पुरातन मंदिरे विद्यमान आहेत जेथे भक्तांची दर्शनासाठी रिघ लागते. देशात पापभीरु.. भाविक.. श्रद्धावान समाज असेल तरच देशाची प्रगती होते, हे आमच्या इतिहासातील राज्यकर्त्यांना ठाऊक होते. भक्तीमार्गाचे हे मुल्य त्यांनी जाणले होते. त्यांनी मंदिरांचे संरक्षण केले.. संतमंडळींचा सन्मान केला.
पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक.. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक मंदिर म्हणजे कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर. इ. स. ६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव याने हे बांधले आहे. यावरच्या परकिय आक्रमणानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता.
नवरात्राचा उत्साह सर्वत्र दिसतोय. मंदिरे सजलीत. घरोघरी घटस्थापना झाली आहे. घटाभोवतीच्या मातीतून हिरवे अंकुर फुटू लागण्याची प्रतिक्षा आहे. देवीला सुगंधी पुष्पमाला घातलेल्या आहेत. शेजारी सुंदर रांगोळी रेखाटल्या आहेत. अखंड तेवणाऱ्या आनंददीपाच्या ज्योतीच्या प्रकाशाने उजळलेले देवघर सर्वांना सुखावत आहे.
प्रसन्न अंतकरणी कुटुंबिय आपल्या कुलदेवीच्या पूजनात रममाण आहेत. प्रत्येक घरात त्या घराण्याच्या देवीच्या पारंपरिक आरती आहे. संतांच्या अलौकिक प्रतिभेचे दर्शन त्यामधून घडतेय. त्याच्या चालीही एवढया गोड आनंददायी आहेत की भक्त मनाला सुखावत वेगळ्या विश्वाची अनुभूती प्राप्त होत आहे.
प्रत्येकच घराण्याला कुलदेवता आहे. कुलदेवता म्हणजे वडिलधारे सांगतात की.. आपल्या घराण्यातील पूर्वज या देवतेची पुजाअर्चा करायचे. जगावर आजवर कितीतरी अनाकलनीय.. अविश्वसनीय संकट आली. पण तरीसुद्धा आपल्या या कुलदेवतेच्या कृपेने आजही आपले संसार आनंदात सुरु आहेत. आपल्या घराण्याची वंशवेल कधीच खुंटलेली नाही.
कुलदेवीच्या कृपेने हे आपले गोकुळ आनंदी आहे. घराण्यावर आईचा वरदहस्त रहावा.. कृपादृष्टी रहावी.. आशीर्वाद लाभावेत म्हणून कुलदेवी पूजनाची श्रद्धायुक्त परंपरा घरोघरी सुरु आहे.
प्रत्येक पूजेवेळी आणि शुभप्रसंगी कुलदेवीचे आशीर्वाद मागितले जातात. आजच्या काळात ही दैवतांची ठिकाणे दूर असली तरीही तो कुलदेवीच्या दर्शनासाठी वर्षात एकदा येतोच. कुलदेवीमुळेच त्यांची गावाशी नाळ जुळलेली आहे. समाजात एकोपा राहतोय. या नवरात्रात भक्तांना दर्शनासाठी अनेक मंदिरे ही जास्त वेळ उघडी राहणार आहेत.
कुलदेवीच्या पूजा अर्चनेचा हा नवरात्र उत्सवाचा कालावधी म्हणजे भक्तांसाठी आनंदपर्वच.
*जय अंबे जगदंबे*
*सकलांची माता*
*तू सकलांची माता*
*करवीर निवासिनी*
*आळविते गाथा*
*जय देवी जय देवी*
*जय जय जगदंबे*
*कोल्हासूर दैत्याने*
*भक्तांना छळीले*
*संकट कोसळले की*
*त्रिभुवन डळमळले*
*दयावती झालीस तू*
*दुःख तुला कळले*
*नारायणी तुजवाचून*
*कोण आम्हा त्राता*
*दक्षिण काशी म्हणती*
*करवीर क्षेत्रासी*
*तू नवदुर्गा रणदुर्गा*
*अक्षय अविनाशी*
*अभयदान मागाया*
*आलो चरणासी*
*तेजातून उजळती*
*या मोक्षांच्या वाटा*
*गोपुर शिखरे अवघी*
*भिडली या गगनी*
*पंचनद्यांची गंगा*
*आली उद्धरणी*
*अगाध महिमा गाता*
*शिणली ही वाणी*
*धन्य धन्य जीवन हे*
*उद्धरी मज आता*
ॐ कुलदेवताभ्योनमः
‼या देवी सर्वभूतेषु माँ ब्रह्मचारिणी रूपेण संस्थित‼
‼️नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः‼
*२३.०९.२०२५
संकलन -अभय बक्षी नागपूर
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment