राष्ट्रीय क्रीडा दिन : क्रीडाभावनेचा जागर.

 राष्ट्रीय क्रीडा दिन : क्रीडाभावनेचा जागर

मूल, दीपक देशपांडे.

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे राष्ट्रीय क्रीडा दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके होत्या. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “क्रीडा ही व्यक्तिमत्व घडविण्याची एक शाळा आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, वेळेचे भान, संघभावना व मानसिक ताकद निर्माण होते. शिक्षणाइतकीच क्रीडा हेदेखील जीवनाच्या यशाचे गमक आहे. राष्ट्रीय क्रीडा दिन विद्यार्थ्यांना या जाणिवा दृढ करण्याची संधी देतो.”

प्रमुख वक्ते म्हणून डॉ. महेश जोशी (शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख, केवलराम हरडे वाणिज्य महाविद्यालय, चामोर्शी) यांनी मेजर ध्यानचंद यांच्या अद्वितीय क्रीडा योगदानाचे स्मरण करून दिले. त्यांनी सांगितले की, “मेजर ध्यानचंद यांनी हॉकीच्या माध्यमातून जगाला भारताचे क्रीडाशौर्य दाखवून दिले. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आजच्या पिढीने मेहनत, चिकाटी आणि प्रामाणिकपणा आत्मसात करावा.”

विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले मान. शेलोकर सर (मुख्याध्यापक, चिरोली) यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा व शिक्षण या दोन्हीचा समतोल साधण्याचा सल्ला दिला.

यावेळी कर्मवीर महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. अतुल पारखी यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नमूद केले की, “क्रीडा हे केवळ स्पर्धा जिंकण्याचे साधन नाही तर जीवन जिंकण्याचा मंत्र आहे. क्रीडेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सामाजिकता वाढते. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.”

पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा जीवनावर प्रकाश टाकला. सुयोग्य सूत्रसंचालन प्रा. समीर अल्लूरवार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. हितेश मडावी यांनी केले.

महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने कार्यक्रम अधिकच उत्साही झाला. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, संघभावना आणि आरोग्यदायी जीवनशैलीची प्रेरणा निर्माण झाली.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.