कर्मवीर महाविद्यालय मूल येथे क्रांती दिन साजरा--

 कर्मवीर महाविद्यालय मूल येथे क्रांती दिन साजरा--

दीपक देशपांडे 

मूल : शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय मूल येथे क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनाचा शुभारंभ झालेल्या ऐतिहासिक दिवशी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी व वैचारिक जागर निर्माण व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.                                      

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. अनिता वाळके मॅडम होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून मान. नितीन घरोटे, मुख्याध्यापक स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मूल यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान. नितीन घरोटे यांनी  आपल्या वक्तव्यातून , ९ ऑगस्ट १९४२ ला भारत छोडो आंदोलन सुरू झाले आणि संपूर्ण देश एकत्र उभा राहिला. यामध्ये विद्यार्थ्यांचा,तरुणांचा मोठा सहभाग होता.आजच्या काळात आपल्याला याच क्रांतीचा अर्थ नव्याने समजून घेऊन सामाजिक अन्याय,भ्रष्टाचार, विषमता याविरुद्ध लढण्याची गरज आहे,असा मौलिक संदेश दिला.

      प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात इतिहास,आधुनिक समाज व शिक्षण यांचा सुरेख संगम साधत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले. क्रांती दिन म्हणजे देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्रसैनिकांच्या स्मृती जागवण्याचा दिवस आहे. विद्यार्थ्यांनी त्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक जाणीव, विवेक आणि राष्ट्रीय बांधिलकी वाढवावी. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक क्रांती घडवावी असे सांगून आधुनिक भारताला नव्या विचारसरणीच्या, विज्ञाननिष्ठ, पर्यावरण-जाणीव संपन्न आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम पिढीची गरज आहे. आपले विचार,वर्तन आणि कृतीतूनच आपण स्वातंत्र्य सैनिकांना खरी श्रद्धांजली अर्पण करू शकतो असे प्रेरणादायी विचार व्यक्त केले. 

याप्रसंगी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना क्रांती दिनाचे ऐतिहासिक महत्त्व सांगून स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचा गौरव केला. कार्यक्रमाला विचारपीठावर पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर, प्रा. इस्तारी पडोळे, प्रा. अनिल शेलेकर, प्रा. राहुल बोधे, प्रा. निरज चन्ने, प्रा. समीर अल्लुरवार, प्रा. हितेश गेडाम, प्रा.पल्लवी गंडाटे उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. सिकंदर लेनगुरे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमानंतर वृक्षांना राखी बांधण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प केला. स्वातंत्र्य ही फक्त राजकीय संकल्पना नसून ती सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारी देखील आहे, असा संदेश यावेळी या उपक्रमातून देण्यात आला.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.