स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षाभिमुख अभ्यास व ध्येयाप्रती वचनबद्धता असावी: अमित तुमडाम
स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षाभिमुख अभ्यास व ध्येयाप्रती वचनबद्धता असावी: अमित तुमडाम
मूल : दीपक देशपांडे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि महाविद्यालय, मूल येथे प्लेसमेंट सेल व स्पर्धा परीक्षा फोरम अंतर्गत देशपातळीवर (UPSC, NABARD, FCI, IFFCO, IBPS) तसेच राज्यपातळीवर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा, कृषी सेवा, वन सेवा, इत्यादी स्पर्धा परीक्षांमध्ये विध्यार्थ्यानी घवघवीत यश प्राप्त करून उच्च पदांवर आरूढ होण्याकरिता महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदर व्याख्यानाचे आयोजन दि. १८ ऑगस्ट रोजी करण्यात आले. यासाठी श्री. धर्मेंद्र गिऱ्हेपुंजे, उपविभागीय कृषी अधिकारी, गडचिरोली, श्री. अमित तुमडाम, तालुका कृषी अधिकारी, चामोर्शी तसेच श्री. संजय मेश्राम, मंडळ कृषी अधिकारी, गडचिरोली यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले गेले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. व्हि. जी. अतकरे, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, मूल यांनी भूषविले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गितांशु डिंकवार सहाय्यक प्राध्यापक (वनस्पती रोगशास्त्र) यांनी केले. कार्यक्रमाचे अतिथी व मार्गदर्शक श्री. संजय मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करून वेळेचा सदुपयोग करण्याचे आवाहन केले. तसेच ज्ञान, दिल्याने वाढते, ते इतरांना देत रहावे असे सांगितले. श्री. अमित तुमडाम यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य उज्वल व्हावे याकरिता योग्य दिशा निवडून त्यासाठी अविरत प्रयत्न करावे असे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची योग्य पद्धत सांगितली व परीक्षेची तयारी करताना परीक्षाभिमुख अभ्यास करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व मार्गदर्शक श्री. धर्मेंद्र गिऱ्हेपुंजे यांनी " महाराष्ट्र लोकसेवा आयोग कृषीसेवा परीक्षेची तयारी" या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना पूर्व व मुख्य परीक्षेची पद्धत कशी असते, शैक्षणिक पात्रता काय असते, त्यासाठी तयारी कशी करायची, इत्यादी बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी अभ्यासक्रमातील विषयांचे सखोल अध्ययन करण्याचे व नियमित आणि एकाग्रतेने अभ्यास करण्याचे आवाहन केले. डॉ. आर. पी. गजभिये, प्राध्यापक उद्यानविद्या यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना ध्येय गाठण्याकरिता निर्णय, नियोजन, शिस्त, कठोर परिश्रम व ध्येयाप्रती वचनबद्धता असा पंचसूत्री मंत्र दिला. त्यांनी विविध यशस्वी मुलांचे उदाहरण देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. व्हि. जी. अतकरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर जीवनाचा पीएच (pH) म्हणजे शांतता (Peace) आणि आनंद (Happiness) यांना संतुलीत ठेवल्यास कोणतेही आव्हान पेलता येईल त्यामुळे संयम ठेऊन कृतीला गतिमानता द्यावी असा सल्ला दिला. सदर कार्यक्रमाच्या सर्व अतिथी व मार्गदर्शकांना महाविद्यालयातर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी च्या सर्व सत्रातील विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळीनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विशाखा डोंगरे, सहाय्यक प्राध्यापक, मृद विज्ञान यांनी केले व कार्यक्रमाची सांगता डॉ. गितांशु डिंकवार, सहाय्यक प्राध्यापक (वनस्पती रोगशास्त्र) यांच्या आभारप्रदर्शनाने झाली.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment