वृक्षारोपण...!

 वृक्षारोपण....!



मूल,दीपक देशपांडे 

उपजिल्हा रुग्णालय मूल, सामाजिक वनीकरण विभाग मूल,तथा संजीवन पर्यावरण संस्था मूल,यांच्या संयुक्त विद्यमानाने उपजिल्हा रुग्णालय मूल येथील परिसरात दिनांक २ऑगस्ट२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगण्यात आले व ७० ते ८० औषधी वनस्पती व इतर विविध प्रकारचे वृक्ष सामाजिक वनीकरण मूल, अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आले.  व रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्येकी १ वृक्षारोपण करून त्याची जोपासना करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

सदर वृक्षारोपण कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ देवेंद्र लाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ शिरीष शेंडे, डॉ  अनिता मेश्राम, डॉ तीरथ उराडे व रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचारी हजर होते.तसेच सामाजिक वनीकरण मूल च्या वनपरिक्षेत्र अधिकारी कु. एस. जी.बगडे, वनपाल आर.एस.ठमके,वनपाल व्ही.व्ही.येरमे, वनरक्षक व्ही.जी.चौधरी, वनरक्षक कु.ए.ए.गीते..व संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे, उपाध्यक्ष प्रशांत मुत्यारपवार, प्रशांत केदार, पंकज उजवने, अंकुश वाणी, दिनेश खेवले, हौशिक मंगर, हर्षल वाकडे, तन्मय उराडे, तरुण उपाध्ये, अक्षय दुम्मावार उपस्थित होते.

वृक्षारोपण करण्याकरिता श्री प्रफुल लांडेकर व गौरव मूमडवार यांनी विशेष प्रयत्न केले.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.