दिनविशेष ! हरितालिका पूजा

     दिनविशेष !

    हरितालिका पूजा

     झाले.. ....प्रतिक्षा संपत आलीय. ज्या गणेशोत्सवाची सर्वांना वर्षभर आतुरता असते तो गणेशोत्सव अगदी उद्यावर आलाय. देशभरातील बाजारात 'श्री'च्या स्वागताचा अभूतपूर्व उत्साह दिसून येत आहे. सर्व गणेशभक्त हा उत्सव सानंद भक्तीभावाने साजरा करणार. गणेशोत्सवासाठी सुंदर आरास करण्यात येतेय. सार्वजनिक मंडळेच नाही तर घरोघरी पण सुंदर असे अध्यात्मिक.. उपदेशात्मक.. ऐतिहासिक प्रसंगाचे देखावे सादर करण्यात येत आहेत. असा हा उत्सव सानंद संपन्न होणार आहे.

        श्री च्या आगमनाआधी पूजन होते ते श्री गणेशाच्या आईवडीलांचे. आज हरितालिका. जग हे अतुट विश्वास आणि श्रद्धेवर चालतं. सुखी संसारासाठी शेवटी हात जोडले जातात ते देवाकडेच. मानवी कल्पने पलीकडे असलेल्या या शक्तीची सत्ता सर्वत्र चालते हे जीवनात पदोपदी जाणवते. आज या विश्वाचे माता पिता असलेल्या शंकर पार्वतीचे पूजन महिला करणार.

        स्त्री वर्गाने आपले निर्णय स्वातंत्र्य अबाधित ठेवल्याच्या कथा भारतीय पुराणात आहेत. स्री सबलीकरण भाव या अनेक कथातून रुजविलेला आहे. मग ती कथा श्रीकृष्ण रुख्मिणी विवाहाची असो वा उमा शंकर विवाहाची. सर्व स्त्रियांसाठी हा आदर्श. आपले उद्दीष्ट प्राप्तीसाठी प्रयत्नासोबतच भक्ती हा पण एक मार्ग आहे. त्यासाठीच आजचे हरितालिका पूजा व्रत.

        पर्वतराज कन्या पार्वतीचा विवाह नारदांच्या सल्ल्याने वडिलांनी विष्णूंशी ठरविला. पण पार्वतीने मात्र शंकराशी विवाह करण्याचा निर्धार केलेला. तेंव्हा पार्वतीने शंकराला प्रसन्न करण्यासाठी तप आरंभले. उपवास करुन ती शिवलिंगावर निसर्गातील पत्री गोळा करुन वाहू लागली. हेच ते आज हरतालीका व्रत ज्यामुळे पार्वतीमातेला महादेव प्राप्त झाले.

        पौराणिक कथांचा उद्देश  निसर्ग सहवास घडावा.. त्याचे महत्त्व कळावे हा आहे. आज चौरंगाला आंब्याचे तोरण लावून त्यावर शिवलिंग तयार केले जाते. मग हार फुलं सह पत्री अर्पण केल्या जातात. पवित्र अंतकरणाने भक्तीभावाने पूजन.. आरती केली जाते. पूजेतील या सर्व पत्री म्हणजे औषधी वनस्पती आहेत. या पूजेनिमित्य परंपरेने सर्वत्र या वृक्ष.. वनस्पतींचे जतन होते. त्याची ओळख व्हावी हा पण उद्देश सफल होतो.    

        प्रत्येक कन्येला जीवनात मनोवांछीत असा योग्य वर मिळावा, तसेच प्राप्त पतीसह संसार सुखाचा व्हावा असे वाटते. मग स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभावे.. संसार सुखाचा यासाठी आज हे हरतालिका व्रत. सर्व महिला देवांचा देव महादेव आणि पार्वती मातेचे पूजन हरितालिकेला करतात. पूजेत जे काही निसर्गाने दिले आहे तेच फुले.. पत्री.. फळे त्याला अर्पण करतात, उपवास करतात.

       भोले शंकर हा मोठा आधार महिलांना. मग पती या परमेश्वरासोबतच त्यांना शंकराचेही आशीर्वाद हवेतच. त्या सदैव त्याचीच ओढ राहो.. त्याचेच नाव मुखी राहो.. ही इच्छा बाळगतात. यामुळेच त्यांचे भाग्य उजळणार ही खात्री असते.

  *मनीं धन्य झाले तुझे गीत गाता*

  *प्रभू सोमनाथा, प्रभू सोमनाथा*


  *तिथे प्राणनाथ, इथे देवराजा*

  *दोन दैवतांची घडो नित्य पूजा*

  *एक पाठिराखा, एक सौख्यदाता*


  *मनीं मानसी या तुझी ओढ होती*

  *तुझे नाम ओठीं, तुझे रूप चित्तीं*

  *तेच भाग्य माझे मिळे आज हातां*


  *माहेरीचे सूख सासरास आले*

  *जीवशिव दोन्ही एकरूप झाले*

  *कितीकिती गावी तुझी गोड गाथा*

  संकलन -अभय बक्षी नागपूर.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.