दिनविशेष:-अनुराधा नक्षत्री गौरी आवाहन .

     

दिनविशेष  :- अनुराधा नक्षत्री गौरी आवाहन  



        * हिरण्यवर्णां हरिणीं*

        *सुवर्णरजतस्रजाम् ।*

        *चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं*

        *जातवेदो म आवह ॥*

        *हे अग्ने (जातवेद), सोन्यासमान वर्ण असणाऱ्या, सर्व पातकांचे हरण करणाऱ्या (हरिणीसमान सुंदर,चपळ असणाऱ्या), सोन्या-चांदीच्या माळा धारण करणाऱ्या, चंद्राप्रमाणे (शीतल) असलेल्या सुवर्णमय लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर.*

        *भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे 'अस्माकं भारत देशः उत्सवप्रियः अस्ति।' असे सांगितले जाते. गणेशोत्सव हा तर संपूर्ण जगाला प्रिय. देशातच नाही तर जगभरात प्रेमाने एकात्मता निर्माण करणारा.. भक्तीभावाने संपन्न होणारा हा उत्सव.*

       *या उत्सवतील आजचा दिवस तर भक्तांचा आनंद व्दिगुणीत करणारा. वर्षभर भक्त वाट असते त्या गौरी.. महालक्ष्मी आज घरी येणार. शेकडो वर्षे घरोघरी परंपरेने संपन्न होणारा हा मोठा सण.*

    *भक्तीचे ते वर्म जयाचिये हाती ।*

    *तया घरी शांती क्षमा दया ॥*

    *अष्ट महासिद्धि वोळंगती व्दारी ।*

    *न वजती दूsरी दवडिता ॥*

    *तुका म्हणे त्याचा देव सर्व भार ।*

    *चालवी कामार होवोनिया ॥* 

        *.... जगतगुरु तुकोबाराया*

        *संत तुकोबा म्हणतात तशी भक्तांच्या आनंदाची तजवीज परमेश्वर करतोच. वरुण राजा कृपेने राने.. वने.. शेती संतृप्त झालीय. चराचरात प्रत्येक जीवाची क्षुधा शांतीची सोय झालीय. रंगीबेरंगी फुला.. फळांनी बागा बहरल्यात. या संतृप्तीचा.. आनंद मानवी मनाला झालाय. शेतातील संपन्नता बघून शेतकरी वर्ग श्रम साफल्याचा हा आनंद उत्साहाने सण साजरा करून करतात.*

        *आज घरातील ज्या मुली सासरी गेल्या आहेत, त्या मुली या भक्ती सणासाठी विशेष निमंत्रीत असतात. मग त्यांना सासरहून आणायला भाऊराया घुंगराची गाडी घेऊन जातो. त्यामुळे बहिणींना आनंदाचे भरते आलेय. त्याना नविन साड्या नेसून मैत्रीणींसह या सणाचा आनंद लुटता येणार म्हणून त्यांनाही आनंद होतोय.*

        *मूर्ती मग कोणत्याही प्रकारची असो त्याकडे भक्तीभावाने बघितले की देवत्वाचा लाभ होतो. आम्ही सगुण भक्तीचे उपासक. पिढ्यानपिढ्या घरोघरी हे गौरी.. महालक्ष्मी पूजन होत आहे. हे पूजन म्हणजे हर्षोल्हासी मनाचे.. समृद्धीचे प्रतिक. कुठे खड्यांच्या गौरी तर कुठे उभ्या महालक्ष्मी. कुठे तेरड्याच्या झाडाचे. या सणाची प्रांतवार वेगवेगळी असली तरीही पण भक्ती भाव तोच. गौरींच्या पूजनात कोणतीच उणीव नसते. सजावट.. गौरींसाठी भरजरी साड्या.. अलंकार.. हार.. गजरे आणि गौरींचे आवडते पदार्थ.. अशी सगळी हौस भागविणार.*

        *गौरींचे मुखवटे बाहेरून कूंकूम पाऊल खुणासह, कुठे दाराबाहेरुन.. नदीवरुन तर कुठे समुद्रापासून वाजत गाजत आणत मिरवून घरभर फिरवले जाणार. या सोन्याच्या पाउलांनी येणाऱ्या गौरींच्या कृपेने घरात सुख.. समृद्धी.. ऐश्वर्य समाधान.. मनःशांती नांदो, गृहिणींना अखंड सौभाग्य लाभो ही धारणा.*   

        *ॐ महालक्ष्मी नमो नमः*

        *ॐ विश्व जनन्या नमो नमः*


 *बंधु येईल माहेरी न्यायला*

  *गौरी गणपतीच्या सणाला*

  *गाडी घुंगराची येईल न्यायला*

  *गौरी गणपतीच्या सणाला*


  *सण वर्साचा हा गौरी गणपती*

  *सण वर्साचा गणपती*

  *इथ येईल आनंदाला भरती*

  *येई आनंदाला भरती*

  *साडी चोळी नवी ओ ओ ओ ओ*

  *साडी चोळी नवी नेसुन*

  *मिरवायाला*

  *गौरी गणपतीच्या सणाला*

  *बंधु येईल माहेरी न्यायला*

  *गौरी गणपतीच्या सणाला*


  *तिथ जमतील लाडक्या मैतरणी*

  *माझ्या लाडक्या मैतरणी*

  *घेर धरतील भवती साऱ्या जनी*

  *घेर धरतील साऱ्या जनी*

  *मला विनवणी करतील नाचायला*

  *गौरी गणपतीच्या सणाला*

  *बंधु येईल माहेरी न्यायला*

  *गौरी गणपतीच्या सणाला*


  *माहेरी जाया घूमत मन पाखरु*

  *हे घूमत मन पाखरु*

  *आय बापाची ओढ कशी आवरु*

  *मी ओढ कशी आवरु*

  *गोड कौतिक करउनी घ्यायला*

  *गौरी गणपतीच्या सणाला*

  *बंधु येईल माहेरी न्यायला*

  *गौरी गणपतीच्या सणाला*

  *गाडी घुंगराची येईल न्यायला*

  *गौरी गणपतीच्या सणाला*


  *चल ग सई चल ग बाई*

  *गौराई आल्यात सोन्याच्या पायी*


  *गौराई तुमची पुण्याई मोठी*

  *चढून यावं अंगण ओटी*

  *तुमच्या सांगाती लक्ष्मी येई*


  *गौराई तुमचे पाऊलठसे*

  *घरात दारात उठले कसे*

  *सुखाची बरसात अवघ्या ठायी*


  *गौराई कोठीत पाऊल ठेवा*

  *धान्यानं कुणगा भरून जावा*

  *धनाला आता कमती नाही*


  *सैपाकघरात गौराई बसा*

  *चुलीला द्यावा अन्नाचा वसा*

  *सुखाचा घास मुखात जाई*


  *हातात चुडा कपाळी कुंकू*

  *तुमच्या कृपेनं काळाला जिंकू*

  *झुकते पायी,ठेवते डोई*


 संकलन -अभय बक्षी नागपूर.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.