मुद्देमालासह दोन आरोपी जेरबंद.

  एक लाखांच्या मुद्देमालासह दोन आरोपी जेरबंद.



१७९ ग्रॅम गांजा व मोटार सायकलही जप्त.

मूल ,चंद्रपूर दीपक देशपांडे .
अवैधरित्या गांजा बाळगणाऱ्या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून १७९ ग्रॅम गांजा आणि एक मोटर सायकल व नगदी ५०० रूपये असा एकूण एक लाख, ४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २१ ऑगस्ट, २०२५ रोजी सायंकाळी मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन जुना सोमनाथ मंदीर परिसर, मूल रेल्वे स्टेशन, मूल येथे येथे एका मोटार सायकलवरील दोन युवकांना ताब्यात घेवुन त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल बजाज पल्सर च्या मागील सिटच्या खाली विक्री करण्याचे उद्देशाने अंमली पदार्थ सुकलेला गांजा वनस्पती १७९ ग्रॅम किंमत ३५८० रु.चा अमली पदार्थ अवैध रित्या मिळुन आल्याने आरोपी रोहीत प्रेमलाल कोवे (२०), आदित्य उर्फ बुलेट उमाजी मडावी (१९) दोन्ही रा.येरगांव ता. मूल यांचे विरुध्द पोलीस स्टेशन मूल येथे गुन्हा नोंदविण्यात आला असुन त्यांचे ताब्यात मिळुन आलेला गांजा, नगदी ५०० व मोटार सायकल असा एकुण १,०४,८० रुपयाचा माल जप्त करण्यात आला असुन मूल पोलिस स्टेशन येथे त्यांचे विरुद्ध अपराध क्रमांक ३४०/२०२५अन्वये कलम 8c, 20B,29 ndps अन्वये गुन्हा  दाखल करण्यात आला असून दोन्ही  आरोपींना अटक करण्यात आली असून,याचा तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.