सत्याच्या मार्गाने चालणा-या व्यक्तीचा नेहमी विजय होत असतो:-प्राचार्य दिलीप मॅकलवार
सत्याच्या मार्गाने चालणा-या व्यक्तीचा नेहमी विजय होत असतो:-प्राचार्य दिलीप मॅकलवार
दीपक देशपांडे
दुष्टांचा नाश आणि सज्जनांचा विजय याकरीता भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला.कृष्णाचा जिवनप्रवास धैर्य, मैत्री, प्रेम आणि भक्ती शिकवितो.आपसांतील मैत्रीपूर्ण संबंध आणि एकता यामुळे कोणतेही कार्य सहज शक्य होते.
श्रीकृष्णा प्रमाणे आपणही हसतमुख राहून सत्याचा मार्ग धरुन आणि प्रत्येकाशी प्रेमाणे वागुन आपले जीवन सुंदर करावे. सत्याच्या मार्गाने चालणा-या व्यक्तीचा नेहमी विजय होत असतो असे मत राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय देवाडाखुर्द चे प्राचार्य दिलीप मॅकलवार यांनी व्यक्त केले.
ते १६ आॕगस्ट ला मूल तालुक्यातील चिरोली येथे गोल्ला - गोलकर - यादव समाज संघटना द्वारे आयोजित गोकुळाष्टमी कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष - पुरुषोत्तम कोमलवार सेवानिवृत्त नायब तहसीलदार, ऊद्घघाटक - गजानन वल्केवार माजी सभापती पंचायत समिती मुल, दिपप्रज्वलन - रमेश कोमलवार सेवानिवृत्त मुख्य लेखापाल वनविभाग चंद्रपूर, प्रमुख अतिथी - आशिष कावटवार उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभुर्णा, साईनाथ अद्दलवार प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी , प्रशांत रामटेके - तंटामुक्त समिती अध्यक्ष, सुभाष बुक्कावार, बाबुराव भिमणवार, बाबुराव येरमलवार, नरेंद्र कोमल वार, गोपाल मोहुर्ल, सुभाष सुंभ, भाऊजी येरमलवार, श्रीष कोमल वार ,नंदु गज्जलवार, गणेश खोबरे आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
प्रारंभी भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन , मालार्पण आणि दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे ऊद्घघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्राचार्य साईनाथ अद्दलवार यांनी समाज बांधवांनी आपल्या मुलांना योग्य संस्कार देऊन त्यांना उच्च शिक्षण द्यावे. व्यसन हि समाजाला लागलेली भंयकर किड आहे त्यामुळे समाजबांधवांनी व्यसनापासून दूर राहावे.आपल्या कुटुंबाकडे लक्ष केंद्रित करावे. आपसांत एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने राहावे असे मत व्यक्त केले.
यावेळी आशिष कावटवार ,गजानन वल्केवार, रमेश कोमलवार, पुरुषोत्तम कोमलवार यांनी सुध्दा समाज बांधवांना समायोजित मार्गदर्शन केले.सायंकाळी आराध्य साईनाथ मॕकलवार यांच्या हस्ते दहिहंडी फोडुन व महाआरती करून गोपालकाल्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक - साईनाथ मॕकलवार तथा आभारप्रदर्शन वैशाली येडमलवार यांनी केले.शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment