महसूल सप्ताहाचे उद्घाटन व कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा.

 महसूल सप्ताहाचे उद्घाटन व कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा.

दीपक देशपांडे 

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे शासकीय योजनांची माहिती व योजनेचा लाभ नागरीकांना घेता यावा यासाठी दरवर्षी महसुल सप्ताह राबविण्यात येत असतो.दिनांक १ ते ७ ऑगष्ट दरम्यान सदर सप्ताह राबविण्यात येत असुन १ ऑगष्ट रोजी मूल तहसील कार्यालयात महसुल सप्ताहाचा  शुभारंभ थाटात पार पडला. महसूल सप्ताहाचे उद्घाटन मूल येथील  उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मूलच्या तहसीलदार मृदुला मोरे, नायब तहसीलदार विजय पंडिले, प्रदिप चिडे, पुरवठा निरीक्षक शिरभाते आदी मान्यवर उपस्थित होते.

शासनाच्या निर्देशाप्रमाणे १ ऑगस्ट रोजी महसूल दिन व १ ते ७ ऑगस्ट हा महसूल सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाचा शुभारंभ झाला असून यात अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रशासनात पूर्वीच्या आणि आताच्या कामकाजात अमुलाग्र बदल झाला आहे. अत्याधुनिक आणि तंत्रज्ञानस्नेही काम आता महसूल विभागाकडून होत आहे. महसूल प्रशासनावर शासनाने टाकलेली जबाबदारी निश्चितच पूर्ण करण्याचा सर्व अधिकारी -कर्मचाऱ्यांचा मानस आहे.

यावेळी सन २०२३-२४मध्ये उत्कृष्ट कार्य करणारे नायब तहसीलदार विजय पंडिले, पुरवठा निरीक्षक राजेश शिरभाते, मंडळ अधिकारी विजय उरकुडे, ग्राम महसुल अधिकारी शंकर पिजदुरकर, सहा. महसुल अधिकारी मिना सिडाम, महसुल सहा. अमोल करपे, शिपाई प्रणाली गजभिये, महसुल सेवक संजय बावणे, पोलीस पाटील पुंडलिक जवादे यांना गौरविण्यात आले. यासोबतच सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रलंबित सेवाविषयक प्रश्न निकाली काढुन समस्यांवर संवाद साधण्यात आले, त्यासोबतच महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार आदेश पारीत करण्यात आले.                             याप्रसंगी मूल तालुक्यातील वेगवेगळ्या महसूल कर्मचाऱ्यांनी आपले अनुभव कथन करताना वास्तविक जीवन आणि महसूल कर्मचारी म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रत्यक्ष  काम करताना येणारा ताण आणि मानसिक दडपणही शब्दात बांधण्याचा प्रयत्न केला. ज्याची कधी कल्पनाही केली नव्हती  अशा पद्धतीने काम करावे लागत असल्याची खंतही व्यक्त केली.   तहसीलदार मृदूला मोरे मॅडम यांनी यावेळी बोलतांना समस्त उपस्थितांना महसूल सप्ताहाचे आयोजनाची माहिती दिली आणि कर्मचाऱ्यांच्या यशस्वी सहभागाचे कौतुक करीत सगळ्यांच्या सहकार्याने मागील वर्षी उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी झाली नाही आणि शक्य ती उपयुक्त मदत व पंचनामे करण्यात व शासनाच्या १००दिवसीय उपक्रमाला मिळालेला भरभरून प्रतिसाद आणि अनेक प्रकरणांचा निपटारा आणि पांदन रस्ते निर्मिती आणि त्याचे आदेश पारित करुन सातबारावर नोंद करण्यात सहकार्य ही बाब प्रकर्षाने उल्लेख करुन त्यात सहभागी सगळ्यांचे सामुहिक यशात सहभाग नोंदविल्याबद्दल आभारही व्यक्त केले.समस्त उपस्थितांना आणि महसूल कर्मचाऱ्यांना महसूल दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आणि पुढिल काळात असाच यशस्वी सहभाग नोंदविण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली .            याप्रसंगी मूल चे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) महेश कडवलवार यांनी समस्त तलाठी बांधवांना महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका खंड ४चे वाटप केले ज्या पुस्तकात राज्यातील तलाठी,मंडळ निरीक्षक, मंडळ अधिकारी यांची कार्यपद्धती,कर्तव्ये व कार्य आणि ग्राम पातळीवर महसुली लेखांकनपद्धतीची परिपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे .                या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार दिनेश पवार यांनी केले, या कार्यक्रमात महसूल कर्मचारी, पोलिस पाटील, जागृत ग्राहक राजा चे पदाधिकारी कार्यकर्ते व सेतू केंद्र चालक व कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.चहापानानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला .



महसूल सप्ताहानिमित्त २ ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक        ✍️Ddbatmi-m2M✍️ .      9403285344
 

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.