स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशी दारूच्या ३४ पेटया पकडल्या.मूल पोलीसांची कामगिरी

 स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशी दारूच्या ३४ पेट्या पकडल्या.मूल पोलीसांची कामगिरी

२ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त



मूल:-दीपक देशपांडे.

 स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशी दारूच्या ३४ पेटया पकडल्या.  अवैधरित्या आणि विनापरवाना ही वाहतूक सुरू होती. ही कामगिरी मूल पोलिसांनी केली.

रॉकेट संत्रा कंपनीची ही देशी दारू ,मूल ते मारोडा मार्गावरील काटवण टी पाईंट वर नाकाबंदी दरम्यान    पांढ-या रंगाच्या मारोती ८०० एम एच २७ एच ६०५० या क्रमांकाच्या वाहनामध्ये सिलबंद देशी दारूच्या ३४ पेटया आढळून आल्या. या प्रकरणी मूल पोलिसांनी चालक मालक शंकनाथ दिलीप टिंगूसले, वय २५ वर्षे, आणि त्याचा साथिदार अमन अनिल टिंगूसले वय २२ वर्षे, रा. मूल या दोन्ही आरोपीं विरूदध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. यात एक लाख ३६ हजार रूपये किंमतीची देशी दारू आणि पांढ-या रंगाची मारोती ८०० असा एकूण दोन लाख ११हजार रूपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलिस निरिक्षक विजय  राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरिक्षक सुबोध वंजारी यांचे नेतृत्वात पोलिस हवालदार भोजराज मुंडरे, पोलिस अंमलदार नरेश कोडापे,चिमाजी देवकते, शंकर बोरसरे यांनी केली.

मूल पोलिसांच्या कामगिरी मुळे अवैधरित्या दारूची वाहतूक करण्यां-यांमध्ये काही प्रमाणात  दहशत निर्माण झाली आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.