दिनविशेष .🌺अंगारकी संकष्टी चतुर्थी🌺

दिनविशेष 

    🌺अंगारकी संकष्टी चतुर्थी🌺

      *गणेशाय नमस्तुभ्यं,*

        *सर्व सिद्धि प्रदायक ।*

        *संकष्ट हरमे देवं,*

        *गृहाणार्घ्यम् नमोऽस्तुते ॥*

        *कृष्णपक्षे चतुर्थ्यातु,*

        *सम्पूजितं विधूदये ।*

        *क्षिप्रं प्रसीद देवेश,*

        *अंगारकाय नमोऽस्तुते ॥*

       *आज भक्त मन आनंदलेय. आज फारच मोठा योग आहे. चातुर्मासातील या श्रावण महिन्यात आज आहे अंगारिका संकष्टी. असा योग फारच कमी येतो. जी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते ती अंगारकी म्हणून ओळखली जाते.*

        *आजच्या अंगारिका संकष्टीचे महात्म्य मोठे. ही भक्तीमय अशा पवित्र श्रावण महिन्यात आलीय. हा महिना शिवाचा. श्री गणेश हे शिवपुत्र.*

        *जीवन सरळ रेषेत कधीच चाललं नाही. दोष नसताना अकल्पित संकट.. पेच प्रसंग सामोरे ठाकतात. अनेक अडथळे निर्माण होतात. प्रगतीचे मार्ग खुंटतात. मग आजच्या या संकष्टीच्या व्रत पालनाने संकट.. अडथळे कोणतेही असोत, दूर होत सुखाचा मार्ग प्रशस्त होतो.*

        *मग आज पहाटेपासूनच गणेश मंदिरात भक्तांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्यात. आजच्या उपवासाने अंगारकाच्या सहस्त्रवर्ष तपाचे पुण्य भक्तांना वाटले जाणार. आज प्रसन्न होणारा मंगळही कृपा करणारा आहे. म्हणूनच आज या चतुर्थीच्या उपवास.. उपासनेचे पुण्य सर्वाधिक. ज्याना संकष्टी व्रत प्रारंभ करायचे असते ते आज प्रारंभ करतात.*   

        *अंगाराकासारखं लाल अंग असलेल्या बाळाला भारद्वाज ऋषींनी संभाळले. या बाळाला वेदमंत्र शिकवले. पुढे त्याने नर्मदा परिक्रमा करून कठोर तपसाधना करून गणेशाला प्रसन्न केले. हा वार होता मंगळवार. त्यादिवशी संकष्टी होती. श्री गणेशाने अंगारकाला वर मागायला सांगितले. तेव्हा तुमच्यात सामावून घ्या.. तुमच्या सोबत माझे नाव यावे म्हटले. तेव्हा ज्या मंगळवारी संकष्टी असेल ती तूझ्या नावानं ओळखली जाईल.. या संकष्टी व्रत करणाऱ्यावर माझी कृपादृष्टी राहील असा वर दिला.*

        *आज 'श्री' विषयी अष्टसात्विक भाव जागृत होत उपवास होणार. अथर्वशीर्ष पठण.. गणेश स्तुती स्तोत्र.. आरती केली जाणार. आज समस्त भक्त आनंदी आहेत. त्यांना लाडक्या बाप्पाचे विलोभनिय दर्शन घडतेय. भल्या पहाटेच सुगंधी फुले गंध चंदनासह पूजा आरंभलीय. श्री गणेशाचे पूजन तर सर्वात आधी. अग्रपूजेचे मानकरी. दिशा उजळवणारी सूर्याची ती तांबूस कोवळी किरणे म्हणजे गणेशाच्या स्वागताच्या पताकाच.*  

        *श्री गणेश पूजनाआधी त्याची शांताबाईंच्या शब्दांत स्तुती केली जातेय. लतादिदींचा स्वर्गीय स्वर आणि पं. हृदयनाथ यांच्या संगीताने सजलेल्या अप्रतिम गीतात या दात्या "श्रीं" चे विलोभनीय दर्शन घडून भाविक मन सुखावून आनंदी होत आहे.*

       *दाता तू गणपती गजानान*

  *भजती तुजसी गुणीजन*


  *मुक्ता माणिक किरिट शिरावर*

  *गौरतनु वर कस्तुरी केशर*

  *निर्गुण निरवधी सकळ कलानिधी*

  *हे प्रभुवरा अमरनायका*

  *हे शुभकरा भावे*

  *तुजसी आलो शरण*


  *शुंडा उदरी वळली अभिनव*

  *कांती मनोहर रूप नवोनव*

  *रुणझुण चरणी वाजती किंकिणी*

  *हे नटवरा ललित लाघवा*

  *हे प्रियकरा व्हावे घडीघडी* 

  *एक स्मरण*

        *वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ !*

        *निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा !!*

         *विघ्नहर्ता सुखकर्ता गणपती बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समृद्धि, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना.. !!*

   ‼ *ॐ गं गणपतये नमः* ‼    


    संकलन -अभय बक्षी नागपूर.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

   

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.