कृषि महाविद्यालय मूलचा मुलांचा खो खो संघ विजेता!

 कृषि महाविद्यालय मूलचा मुलांचा खो खो संघ विजेता!



दीपक देशपांडे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला अंतर्गत आंतर महाविद्यालयीन खो खो स्पर्धेचे आयोजन ०५ ऑगस्ट ते ०७ ऑगस्ट २०२५ दरम्यान कृषि महाविद्यालय, आमखेडा येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत सर्व शासकीय व निमशासकीय महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. त्यामधे मुलांचे २२ संघ व मुलींच्या १९  संघांनी सहभाग नोंदवला होता. 

कृषि महाविद्यालय मूलच्या  मुलांचा पहिला सामना श्री. शिवाजी कृषि महाविद्यालय, अमरावती या संघा सोबत होता त्यामध्ये कृषि महाविद्यालय मूल संघाने एक डाव व  ८ गुणांनी विजय मिळून स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण केला. त्यानंतच्या  सामन्यात कृषि महाविद्यालय मूलने कृषि महाविद्यालय दारव्हा संघाला १० गुणांनी नमवून या संघाचा धुव्वा उडविला. त्यानंतरच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाला एकहाती नमवून फायनल मध्ये थाटात प्रवेश मिळवला. अती चुरशीच्या अंतिम सामन्यात मागील वर्षीच्या अंतिम सामन्याचा प्रतिस्पर्धी असलेला संघ SVGI उद्यानविद्या महाविद्यालय जळगाव जामोदला नमवून *विजेते पदावर आपले नाव कोरले.* अंतिम सामन्यात *लक्ष्मण रामगिरकर या खेळाडूने ५.५२ मी. बचाव* करत सामना जिंकण्यात आपले मोलाचे योगदान दिले. त्यासाठी त्याला स्पर्धेतील उत्कृष्ठ खेळाडू म्हणुन गौरविण्यात आले. कृषि महाविद्यालय मूल येथील मुलांच्या संघात सहभागी खेळाडूंची नावे भूषण हावरे (कप्तान), लक्ष्मन रामगिरकर, अनिकेत फरकाडे (उप कप्तान), अमित हमंद, कुंदन किन्नाके, दशरथ वानखडे, ओमप्रकाश वाकडे, त्रिकोण रंदये, पंकज येले, श्रीराम धनजोडे, बलवीर झुंगरी, गुरुदेव असोले, चेतन कापगते व प्रज्वल खडसे ही आहेत. 

             कृषि महाविद्यालय मूल येथील मुलींचा संघ पहिल्यांदाच या आंतर महाविद्यालयीन खो खो स्पर्धेत सहभागी झाला होता. मुलींचा पहिला सामना कृषि महाविद्यालय नागपूर या संघाशी होता या चुरशीच्या सामन्यात कृषि महाविद्यालय मूल ने नागपूर संघाला २ गुणांनी नमवून उपांत्यपूर्व सामन्यात प्रवेश मिळवला. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुलींच्या संघाने मारोतराव वादाफळे कृषि महाविद्यालय यवतमाळ संघाला एकहाती नमवून उपांत्य फेरीत जोशात प्रवेश मिळवला. उपांत्य फेरीचा सामना आनंद निकेतन कृषि महाविद्यालय वरोरा संघाशी होता. या अत्यंत चुरशीच्या सामन्यात कृषि महाविद्यालय मुलच्या मुलींनी कौतुकास्पद कामगिरी करून सर्व प्रेक्षकांची व इतर खेळाडूंची मने जिंकली पण हा सामना या मुलींनी फक्त १ गुणाने गमावला. सामना संपल्यानंतर आयोजकांनी कृषि महाविद्यालय मुलच्या मुलींच्या संघातील *कु. वेदांती गोखरेचा* सत्काराही केला. मुलींच्या संघाचे नेतृत्व *कु. पल्लवी उरकुडेने* केले.

          कृषि महाविद्यालय मुल येथे दोन्ही मुलांच्या व मुलींच्या संघाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे *मा. डॉ. व्ही. जी. अतकरे, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, मुल* यांच्या अध्यक्षतेखाली गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात दोन्ही मुलांच्या व मुलींच्या संघाचे स्वागत करण्यात आले. तसेच खेळाडूंनी व संघ व्यवस्थापकांनी आपले अनुभव व मनोगत व्यक्त केले. या गोरव सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणात *मा. डॉ. व्ही. जी. अतकरे, सहयोगी अधिष्ठाता* यांनी दोन्ही मुलांच्या व मुलींच्या संघाचे अभिनंदन केले व यानंतर जास्तीत जास्त खेळांमध्ये सहभाग घेऊन आपल्या महाविद्यालयाचा गोरव वाढवावा असे आव्हाहन केले. पुढे बोलतांना ते म्हणाले खेळ खेळल्याने आपले फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक स्वास्थही सुधारते व शिस्त, वेळेचे नियोजन, सामुहिक काम, आत्मविश्वास, आत्त्मसंमान इत्यादी गोष्टीचे महत्व कळते. *डॉ. आर. पी. गजभिये, प्राध्यापक उद्यानविद्या* यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना मुलांच्या व मुलींच्या संघाचे कौतुक केले व त्यांच्या उत्साह वाढविला. 

 कृषि महाविद्यालय मुलच्या दोन्ही मुलांच्या व मुलींच्या संघाच्या खेळाडूंनी आपल्या या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे *मा. सहयोगी अधिष्ठाता डॉ. . व्ही. जी. अतकरे सर* तसेच संघ व्यवस्थापक डॉ. अक्षय इंगोले, डॉ. अमरदीप डेरे, डॉ, गीतांषु डिंकवार, डॉ. मनीषा लवणकर व महाविद्यालयातील  प्राध्यापकवृंद यांना दिले .


दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.