महसूल सप्ताहाचे आयोजन.
मूल तालुक्यात महसूल सप्ताहाचे आयोजन.
दीपक देशपांडेमहाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व महसूल विभागात १ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून आपल्या मूल तहसील कार्यालयाच्या वतीने पाचही मंडळात हा महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याचे व या संधीचा फायदा घेत नागरिकांनी आपल्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मूलच्या तहसीलदार मृदुला मोरे मॅडम यांनी वार्तालाप करताना केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना त्यांनी या सप्ताहाची सुरुवात १ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी समारंभात तहसील कार्यालयात महसूल संवर्गातील कार्यरत /सेवानिवृत्त अधिकारी -कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण व लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभाने या सप्ताहाची सुरुवात होणार आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️
9403285344

Comments
Post a Comment