नागपूरच्या कलेक्टर झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.
नागपूरच्या कलेक्टर झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.
नागपूर , दीपक देशपांडे.
विद्यार्थ्यांनी आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवला तर अपेक्षित ध्येय गाठता येते. त्यासाठी त्यांनी आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे. तुमच्याजवळ ज्ञान आहे पण ते मांडण्याचे कौशल्य तुमच्या ठिकाणी निर्माण केले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या महाज्योतीचे प्र. महाव्यवस्थापक व सुप्रसिद्ध राजपत्रित अधिकारी व वक्ते श्री प्रशांत वावगे यांनी नागपूर येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या धनवटे नॅशनल कॉलेजच्या विमलाबाई देशमुख सभागृहात बोलताना काढले. नागपूरच्या मराठा भिशी ग्रुपने आयोजित केलेल्या कलेक्टर झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ व मिशन आय ए एस.चे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे हे होते.
या कार्यक्रमात यावर्षी कलेक्टर झालेले श्री श्रीरंग कावरे श्री अपूर्व बालपांडे कु.भाग्यश्री नैकळे व सौरभ यावले यांचा व त्यांच्या आई-वडिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .तसेच तेजस प्रकाश भोसले, अथर्व संभाजी भोसले, शांकरी किशोर जाधव या गुणवंतांचा देखील याप्रसंगी सत्कार करण्यात आला. विचारपिठावर नागपूर मराठा भिशी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. प्रदीप घोरपडे नागपूर विद्यापीठाचे संचालक श्री संभाजी भोसले मराठा विद्या प्रसारक समाजाचे माजी अध्यक्ष व नागपूरचे राजे श्री संग्रामसिंग महाराज भोसले, डॉ. मोहनदास गाडबैल हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. प्रदीप घोरपडे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी आयएएस झालेल्या सर्वश्री श्रीरंग कावरे अपूर्व बालपांडे व भाग्यश्री नैकळै या सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात देवरी तुमसर भंडारा ब्रह्मपुरी किनखेडा काटोल खामगाव कारंजा या भागातून मिशन आय ए एस.चे पदाधिकारी व विद्यार्थी सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात शशिकला देविदास किरपाणे व प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांचाही गौरव करण्यात आला. याप्रसंगी सर्वश्री चंद्रशेखर आसोले शंकर पत्रे संजय काशिवार मुनीराम कुथे श्रीकांत कुकडे श्रीधर जाधव कुणाल देशमुख हर्ष यादव अभिजीत मानकर विलास वानखडे यांनी विचारलेल्या प्रश्नांची आय ए एस झालेल्या विद्यार्थ्यांनी समर्पक उत्तरे दिलीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हंबीरराव मोहिते यांनी केले.सुमारे तीन तास चाललेल्या ह्या कार्यक्रमाlच्या यशस्वितेसाठी मराठा भिशी ग्रुपचे सर्वश्री गजेंद्र जाधव हेमंत शिर्के डॉ.श्रीकांत जाचक प्रदीप कान्हेरे सतीश मराठे हेमंत भोसले दिलीप मामुलवार मनीष चवले सुरेश वाघ विठ्ठलराव जवळकर तसेच मराठा महिला भिशी ग्रुपच्या सर्व महिला सदस्यांनी अथक परिश्रम घेतले .कार्यक्रमाची सांगता श्री बाळासाहेब गायकवाड यांच्या आभाराने झाले. या कलेक्टर झालेल्या विद्यार्थ्यांच्या अभिनव कार्यक्रमाला नागपूर रसिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण सभागृह भरगच्च भरले होते. विशेष म्हणजे पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत एकही प्रेक्षक सभागृहाच्या बाहेर गेला नाही.
इतका प्रभाव या कार्यक्रमाचा उपस्थितांवर जाणवत होता. एक अतिशय स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल नागपूरच्या मराठा भिसी ग्रुपचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment