Skip to main content

वाघाच्या हल्यात गुराखी जखमी.

   वाघाच्या हल्यात  गुराखी जखमी.

दीपक देशपांडे.


मूल  तालुक्यातील मारोडा जंगलातील कक्ष क्र.३५० मध्ये गुरे चारण्या करीता गेलेल्या मौजा आदर्श खेडा  मारोडा येथील गणपत बालाजी मानेवार वय (६० ) ह्याचेवर हल्ला करून नरभक्षी वाघाने हल्ला करुन मान पकडली व त्याला जखमी केल्याची घटना  दिनांक १९ जुलै २०२५ रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. त्याही परिस्थितीत जखमी गणपत मानेवार हे वाघाच्या तावडीतून सुटून एक ते दीड की.मी. अंतर पायी चालत गावाकडे आले. 

घडलेल्या घटनेची माहीती होताच वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक आर. सी. पेदापल्लीवर  यांनी तात्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन  घटनास्थळी धाव घेतली व लागलीच  जखमी गणपत बालाजी मानेवार यांना उपजिल्हा रूग्णालय मूल येथे उपचारासाठी नेण्यात आले. 

गुराखी गणपत यांच्या मानेवर जखम असल्याने अधिक रक्तस्राव होऊ नये म्हणून जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याचे  क्षेत्र सहाय्यक पेदापल्लीवार यांनी सांगितले. या घटनेत वनरक्षक दुधे, वनमजूर यांनी सहकार्य केले. या वनपरिक्षेत्राचे अधिकारी हे मुख्यालयी नसल्याचे समजले ,डीडीबातमीसाठी आम्ही  रात्री उशिरापर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही.

वाघाच्या  सततच्या  वाढत्या हल्ल्याचा विचार करता मारोडा येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचाराची व्यवस्था असणे आवश्यक असताना मारोडा या गावात कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसणे , वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसणे हे प्रकार वारंवार निदर्शनास येत असून मारोडा आणि परिसरातील कोणत्याही प्रकारचे रुग्णांना जर आवश्यक सेवा उपलब्ध होत नसतील तर  केवळ बुजगावणे म्हणून  उभारलेले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद कां करण्यात येत नाही ?असाही प्रश्न यानिमित्ताने ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे ,तर येथील वैद्यकीय अधिकारी यांनी पूर्ण वेळ मारोडा येथे उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे मत अनेक गावकऱ्यांशी आमचे सोबत चर्चा करताना व्यक्त केले.

त्याहूनही अधिक कहर तर तेंव्हा झाला जेंव्हा ही घटना घडून गेली त्यानंतर या वन परिक्षेत्रात नरभक्षी पट्टेदार वाघ  फिरत आहे. त्यामुळे नागरिकांनी व गुराख्यांनी आपल्या जीवाच्या रक्षणासाठी जंगल परिक्षेत्रात जाण्याचे टाळावे. असे वनविभागाने नागरिकांना आवाहन केले , त्यामुळे  सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर व आसपासच्या परिसरातील नागरिकांनी याबाबत असंतोष व्यक्त करीत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मशागत , पेरणी, रोवणीची कामे करायचीच नाहीत काय?  असा प्रश्न उपस्थित केला व मग वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचारी यांनी जंगलालगतच्या परिसरात गस्त घालत वाघाच्या अस्तित्वाची जाणीव आधीच करून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही पुढे आली आहे.

एकंदरीत नवीन हंगामाच्या सुरवातीला पुन्हा एकदा डोकं वर काढत असलेला हा वादातीत विषय दरवर्षी किती निरपराध लोकांचे जीवन संपवून आपली दहशत निर्माण करणार? शासन, शासकीय अधिकारी , शासनव्यवस्था  वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी तातडीची पावलं उचलून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी थातुरमातुर तात्पुरती मलमपट्टी करून कारवाई सुरू असल्याचा बेबनाव करीत अजून किती निरपराध लोकांचे बळी घेणार?

असा प्रश्न ग्रामस्थांना सतत भेडसावत असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.

 

दीपक देशपांडे✍️मुख्य संपादक

         9403285344

  ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.