कृषि शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

 कृषि शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

मूल : दीपक देशपांडे.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते *दिवंगत वसंतराव नाईक* यांच्या  जयंती निमित्य दरवर्षी दिनांक १ जुलै २०२५ ला *“कृषी दिन”* साजरा करण्यात येतो. याअंतर्गत १ जुलै ते ७ जुलै हा आठवडा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन *“कृषी सप्ताह”* म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने कृषी सप्ताहाचे औचित्य साधून, कृषी महाविद्यालय मूल चे सहयोगी अधिष्ठाता डॉ.  व्ही. जी. अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी महाविद्यालय मूल येथील विषयतज्ञांनी दिनांक ०४ जुलै, २०२५ शुक्रवार रोजी ग्राम *मरेगांव* ता. मूल जि. चंद्रपूर येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला.

 या प्रसंगी, मरेगांव या गावचे शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मूल येथील विविध विषयांचे विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. सुरवातीला शेतकऱ्यांच्या खरीप हंगामात चालू झालेल्या धान, तूर, इतर भाजीपाला पिके, पशुपालन याबाबत समस्या जाणून घेतल्या, त्यानंतर महाविद्यालयाचे प्राध्यापक व *उद्यानविद्या विषयतज्ञ डॉ. आर. पी. गजभिये* यांनी खरीप हंगामात चालू झालेल्या धान, तूर व इतर भाजीपाला पिकांसाठी जास्त उत्पन्न मिळवता येणाऱ्या लागवड तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

सहाय्यक प्राध्यापक *डॉ. एस. आर. मुन्नरवार पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषयतज्ञ* यांनी, जनावरांचे लसीकरण आणि  दुधाळू जनावरांची निगा कशी राखावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले.

 त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक *डॉ. अक्षय इंगोले, मृद विज्ञान विषयतज्ञ* यांनी धान पिकाला खते कशी ‌द्यायची याब‌द्दल माहिती सांगितली तसेच विद्यापीठामध्ये द्रवस्वरुपात उपलब्ध असलेल्या सूक्ष्म अन्नाद्रव्यांबाबत सविस्तर माहिती दिली. 

सहाय्यक प्राध्यापिका *डॉ. प्रविणा बरडे, वनस्पती रोगशास्त्र विषयतज्ञ* यांनी धान पिकांवरील सुरवातीच्या काळातील करपा, मानमोडी व कडा-करपा, या रोगांच्या उपाययोजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच पीकावर येणाऱ्या मर व मुळकुज रोगांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा या परोपजीवी जैविक बुरशीनाशकाचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले. 

सहाय्यक प्राध्यापिका *मोहिनी पुनसे कृषिविद्या विषयतज्ञ* यांनी धान पिकाच्या बीजप्रक्रिया, रोपवाटिका व्यवस्थापनाबाबत तसेच तण नियंत्रणानाबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. 

महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका *मनीषा लवणकर कृषी विस्तार शिक्षण विषयतज्ञ* यांनी शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या व विविध विषयांचे समाविष्ट असलेल्या कृषिसंवादिनीबाबत माहिती दिली व विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात कशी भर पडू शकते याबाबत विस्तृत मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले.


दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.