मिशन आय ए एस परिवारातील कु. शिफा कासार दक्षिण कोरियाला.

 मिशन आय ए एस परिवारातील 

कु. शिफा कासार दक्षिण कोरियाला

अमरावतीच्या मिशन आयएएस परिवारातील उपाध्यक्ष श्री मेहबूब कासार सेवानिवृत्त उपायुक्त जीएसटी मुंबई यांची कन्या कु. शिफा कासार हिला दक्षिण कोरिया राष्ट्रातील सेऊल येथे होणाऱ्या चार दिवसीय २८ व्या आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र संघटनेच्या अधिवेशनात आपले विचार व्यक्त करण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेले आहे. अशा प्रकारची निवड झालेली ती महाराष्ट्रातील एकमेव महिला उमेदवार आहे. महाराष्ट्रात कु. शिफा हिने राजकीय विश्लेषक म्हणून नावलौकिक प्राप्त केलेला आहे. त्यामुळे तिची उपरोक्त चार दिवसीय अधिवेशनासाठी निवड झाली आहे.

कुमारी शिफा कासार हिने आपले उच्च शिक्षण अजीम प्रेमजी विद्यापीठातून पूर्ण केले आहे. तिला राजकीय विश्लेषण करण्यामध्ये आवड असून या अधिवेशनातील भारतीय राजकीय बदल याचा विश्लेषणत्मक अभ्यास ती उपस्थित मान्यवरांसमोर मांडणार आहे .तसेच महिला केंद्र धोरणांचा राजकीय प्रभाव हा विषय तिच्या मांडणीमध्ये अंतर्भूत आहे.

या आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र संघटनेच्या अधिवेशनाला संपूर्ण जगातून तीन ते चार हजार अभ्यासक प्रतिनिधी येतील अशी अपेक्षा आहे. शिफाने यापूर्वी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना रणनीती व व्यवस्थापन यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले आहे .या पक्षामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ,शिवसेना आणि जनसुराज या राजकीय पक्षाचा समावेश आहे . तूर्त तिने तिचे कार्यालय नवी मुंबई परिसरात सीबीडी बेलापूर  येथे प्रारंभ केले असून त्या ठिकाणावरून ती संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात विविध राजकीय पक्षांना त्यांना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी तसेच राजकीय नियोजनासाठी सल्लागार म्हणून काम करीत आहे.येणाऱ्या काळात महानगरपालिकाच्या निवडणुका होणार असून मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका यासारख्या महानगरपालिका निवडणुकी मध्ये तिची राजकीय विश्लेषक म्हणून महत्त्वाची भूमिका राहणार आहे. तिची ही निवड झाल्याबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून मिशन आय ए एस.चे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे

 संचालक,मिशन आयएएस 

अमरावती कॅम्प 

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.