मूल नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आठवडी बाजार पुन्हा एकदा रस्त्यावर?

 मूल नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आठवडी बाजार पुन्हा एकदा रस्त्यावर?



मूल, दीपक देशपांडे 

मूल शहरातील आठवडी बाजार महात्मा ज्योतिबा फुले मार्केट यार्ड मध्ये स्थलांतरित झाल्यानंतर आतापर्यंत तो अतिशय उत्तम प्रकारे जनतेचा प्रतिसाद मिळवत सुरू होता,मात्र काही व्यावसायिक मंडळींच्या अती लोभापायी किंवा नगरप्रशासनाच्या थोड्याशा दुर्लक्षित पणामुळे जूलैच्या पहिल्या आठवड्यात या बाजारातून काही मंडळी मार्केट यार्डच्या बाहेर  पडले आणि प्रवेश द्वारा जवळ रस्त्यावर उतरून विक्री करताना दिसली.

एकीकडे नागरिकांच्या असंख्य तक्रारी विचारात घेता प्रशासकीय यंत्रणेला रस्त्यावर भरणारा हा बाजार महात्मा फुले मार्केट यार्डच्या आत स्थलांतरित करताना किती त्रास झाला याची पुरेपूर कल्पना असतांनाच थोड्याशा दुर्लक्षित पणामुळे या आठवड्यात बरेच व्यावसायिक रस्त्यावर उतरून साहित्य विक्री करताना दिसले परिणामी महात्मा फुले मार्केट यार्ड रिकामा आणि रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती.

तर दुसरीकडे वाल्मिकी नगर प्रवेश द्वारा पासून ते कृषी उत्पन्न बाजार समिती मार्गावरील चौकापर्यंत रस्त्यावर कपडे विक्रेत्यांनी रस्त्यावर आपली दुकाने थाटली होती परिणामी मूल-गडचिरोली मार्गावरील वाहतूक व्यवस्था बाधित होऊ लागली होती व रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती , आणि याचा परिणाम या चौकापासून महात्मा फुले मार्केट यार्ड परिसरात रस्त्यावरच वेगवेगळ्या साहित्य विक्रेत्यांनी जम जमवायला सुरुवात केली आहे.

नगरप्रशासनाने याबाबत वेळीच दखल घेत उपाययोजना केली नाहीतर पुढिल काळात महात्मा फुले मार्केट यार्ड पुन्हा एकदा ओस पडून संपूर्ण बाजारच रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही ,व पुन्हा एकदा जनतेला येरे माझ्या मागल्या......करीत गर्दीत हरवून बाजारात खरेदी करताना जीव मुठीत घेऊन खरेदी करावी लागेल.

परिणामी परिसरातील नागरिकांना  नाहक त्रास व वाहतूक व्यवस्था कोलमडली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने पुढाकार घेऊन हा बाजार महात्मा फुले मार्केट यार्डच्या आत स्थलांतरित करण्यासाठी बाध्य केले होते , त्यामुळे जूलैच्या पहिल्या आठवड्यात घडलेल्या या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पुन्हा एकदा जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेकडे तक्रार दाखल करीत नगरप्रशासनाच्या थोड्याशा चुकीमुळे बाजार आणि विक्रेते रस्त्यावर आल्याची बाब निदर्शनास आणून दिली असून नगरप्रशासनाने तातडीने यावर  दखल घेत कारवाई करुन परिसरातील नागरिकांना व वस्तू व भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना योग्य न्याय मिळवून द्यावा अशीही मागणी केली आहे.

जागृत ग्राहक राजा मूल तालुका शाखेच्या वतीने मूल नगरप्रशासनाच्या वतीने आपले एक-दोन कर्मचारी मार्केट यार्ड परिसरात तैनात ठेवून त्यांनी अंमलात आणलेली व्यवस्था कोलमडून पडणार नाही आणि कुणीही ती मोडकळीस आणण्याचा प्रयत्न करणार नाही व जनतेला नाहक त्रास सहन करावा लागणार नाही याची काळजी घेण्याची विनंती वजा सुचना केली आहे.

नगरप्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देत ही व्यवस्था अबाधित राखणे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️ Ddbatmi-m2M ✍️

Comments

  1. दिपक देशपांडे
    सस्नेह नमस्कार,
    प्रथमतः आपले मनःपूर्वक धन्यवाद!!!!!!!
    काल मी बाजारात गेलो असता,
    आपण दिलेल्या बातमीनुसार अनागोंदी कारभार होता.काल बाजार खरेदी करण्यासाठी लोकांची फारच धावपळ झाली. वाल्मिकी गेट जवळ फारच गर्दी होती. मी व्हिडिओ काढून तुम्हाला पाठविणार होतो.पण मी विसरलो. आता व्हाटस अप उघडून बघतो तर तूमची बातमी दिसली.... फारच छान... पुढच्या मंगळवारी सुध्दा असीच बातमी लिहा,जेणेकरून नगरपरिषद कामाला लागेल.
    परत एकदा धन्यवाद...
    एक हितचिंतक.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.