कृषी महाविद्यालय मूल अंतर्गत कोटगल येथे कृषीदिन उत्साहात साजरा
कृषी महाविद्यालय मूल अंतर्गत कोटगल येथे कृषीदिन उत्साहात साजरा
दीपक देशपांडे कृषी महाविद्यालय मूल येथील कृषीदूत व कृषीकन्याद्वारे *कोटगल* येथे दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्य दिनांक *१ जुलै २०२५* ला ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत *कृषी दिन* उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत वसंतराव नाईक व डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमास डॉ. व्ही. जी. अतकरे सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय मूल हे अध्यक्ष म्हणून लाभले, तर प्रमुख पाहुणे म्हणून कोटगल गावच्या सरपंच सौ. ममता दुधबावरे, उपसरपंच सौ. तेजप्रभा पंकज भोयर, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अल्का जुवारे व कृषी महाविद्यालय मूल येथील प्राध्यापक, प्रगतशील शेतकरी लक्ष्मण काबेदार व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषीदूत *समय उपरीकर* यांनी केले. त्यानंतर महाविद्यालयाचे *सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे* यांनी अध्यक्षीय भाषणात हरित क्रांतीचे प्रणेते व सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे महानायक वसंतराव नाईक यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला व कृषी दिनाचे महत्व कृषीदूत व कृषीकन्या यांना समजवून सांगितले व शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे वाढवता येईल असे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे असे आवाहन कृषीदूत व कृषीकन्या यांना याप्रसंगी केले.
त्यानंतर *कोटगल गावच्या सरपंच* सौ. ममता दुधबावरे* यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषीदूत व कृषीकन्या गावामध्ये राबवत असलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली व पुढील वाटचालींकरिता शुभेच्छा दिल्या.
*प्राध्यापक उद्यानविद्या* *डॉ. आर. पी. गजभिये* यांनी सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या व कृषीदिनाचे औचित्य साधून सर्व शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे उत्पन्न वाढविता येईल यावर लक्ष केंद्रित करण्याचे आव्हान स्वीकारल्यास शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने कृषी दिन साजरा होईल असे शेतकऱ्यांना पटवून सांगितले.
कृषीकन्या *ऋतुजा भैसारे* यांनी कृषी दिनाबद्दल आपले मत व्यक्त केले व ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत गावामध्ये घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली.
सहाय्यक प्राध्यापक* *डॉ. अक्षय इंगोले* , *मृदाशास्त्र विषयतज्ञ* यांनी माती परीक्षण कसे व का करावे, त्याची शास्त्रीय पद्धत व आरोग्य पत्रिकेबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले व त्यानुसार धान पिकांचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याबद्दल माहिती सांगितली तसेच विद्यापीठामध्ये द्रवस्वरुपात उपलब्ध असलेल्या सूक्ष्म अन्नाद्रव्यांबाबत सविस्तर माहिती दिली.
*डॉ. गितांशु डिंकवार* , *सहाय्यक प्राध्यापिका* तथा *वनस्पती रोगशास्त्र विषयतज्ञ* यांनी धान पिकावर येणारे कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन व त्यासाठी जैविक कीड व रोग नियंत्रणाचे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले.
उद्यानविद्या विषयतज्ञ *सहाय्यक प्राध्यापिका डॉ. अश्विनी गायधनी* यांनी वसंतराव नाईक यांचे कृषी मधील योगदानाबद्दल माहिती दिली व ग्रामीण कृषि कार्यानुभव अभ्यासक्रमांतर्गत कृषीदूत व कृषीकन्या यांनी शेतकऱ्यांकडे असणारे शेतीविषयक अनुभव घ्यावे व त्यांना लागणारा संपूर्ण पिक लागवड खर्चाचा लेखाजोखा तयार करावा असे याप्रंसंगी सांगितले.
महाविद्यालयाच्या *सहाय्यक प्राध्यापिका मनीषा लवणकर* यांनी शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या व तंत्रज्ञान विकसित असलेल्या कृषिसंवादिनीबाबत सविस्तर माहिती दिली व नवीन तंत्रज्ञाचा वापर करून आपल्या उत्पादनात भरघोस वाढ करावी असे याप्रसंगी सांगितले.
सदर कार्यक्रमास एकुण *३९ शेतकरी* , *१० विषयतज्ञ* व *२६ विद्यार्थी* उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन कृषीदूत *बलवीर जुंगारी* व कृषीकन्या *मानसी गुरनुले* यांनी केले आणि उपस्थितांचे आभार कृषीदूत *चैतन्य कापगते* यांनी मानले. हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी *डॉ. अश्विनी गायधनी* कार्यक्रम अधिकारी, ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम यांचे मार्गदर्शन लाभले.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment