निवडणूकीचे नगारे वाजू लागले!
निवडणूकीचे नगारे वाजू लागले!
निवडणूक विभाग व निर्वाचक गणाचे प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द (जि.प. सदस्य संख्या -५६, पंचायत समिती सदस्य संख्या –११२)
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – २०२५
प्रारुप प्रभाग रचनेवर २१ जुलै पर्यंत हरकती व सुचना आमंत्रित ...
चंद्रपूर ,दीपक देशपांडे.
चंद्रपूर जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व त्याअंतर्गत पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या प्रारुप प्रभाग बाबतीत निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे. त्यानुसार जि.प. निवडणूक विभाग ५६ व पंचायत समिती निर्वाचक गणांची प्रभाग रचना ११२ करण्यात आली आहे.
वरीलप्रमाणे निश्चित केलेल्या निवडणूक विभाग व निर्वाचक गण रचनेचे प्रारूप परिशिष्ट ५ (अ) व ५ (ब) मधील अधिसूचना व अनुसूची तयार करून ती शासन राजपत्रात, १४ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालयील सूचना फलक / संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचना २१ जुलै २०२५ पर्यंत जिल्हाधिकारी /संबंधित तहसीलदार यांच्या कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.
अशी आहे जिल्ह्यातील निवडायची सदस्य संख्या : सन २०११ च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागातील एकूण लोकसंख्या १४ लक्ष २३ हजार ३४९ आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या १ लक्ष ९८ हजार २८ असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या ३ लक्ष १८ हजार ३७३ अशी आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग ५६ व पंचायत समिती निर्वाचक गणांची प्रभाग रचना ११२ निश्चित करण्यात आली आहे. यात चिमूर (जि.प. सदस्य संख्या -५, पंचायत समिती सदस्य संख्या – १०), नागभीड (जि.प. सदस्य संख्या -४, पंचायत समिती सदस्य संख्या – ८), ब्रम्हपुरी (जि.प. सदस्य संख्या -५, पंचायत समिती सदस्य संख्या – १०), सिंदेवाही (जि.प. सदस्य संख्या -४, पंचायत समिती सदस्य संख्या – ८), भद्रावती (जि.प. सदस्य संख्या -४, पंचायत समिती सदस्य संख्या – ८), वरोरा (जि.प. सदस्य संख्या -५, पंचायत समिती सदस्य संख्या – १०), चंद्रपूर (जि.प. सदस्य संख्या -५, पंचायत समिती सदस्य संख्या – १०), मूल (जि.प. सदस्य संख्या -३, पंचायत समिती सदस्य संख्या – ६), सावली (जि.प. सदस्य संख्या -४, पंचायत समिती सदस्य संख्या – ८), पोंभुर्णा (जि.प. सदस्य संख्या -२, पंचायत समिती सदस्य संख्या – ४), गोंडपिपरी (जि.प. सदस्य संख्या -३, पंचायत समिती सदस्य संख्या – ६), बल्लारपूर (जि.प. सदस्य संख्या -२, पंचायत समिती सदस्य संख्या – ४), कोरपना (जि.प. सदस्य संख्या -४, पंचायत समिती सदस्य संख्या – ८), जिवती (जि.प. सदस्य संख्या -२, पंचायत समिती सदस्य संख्या – ४) आणि राजूरा (जि.प. सदस्य संख्या -४, पंचायत समिती सदस्य संख्या – ८) अशी आहे.
निवडणूक आयोगाने एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment