ग्राहक राजा जागा हो!- ई चलान कारवाईदरम्यान खासगी मोबाईलचा वापर थांबवण्याचे पोलीस महासंचालकांचे निर्देश
ग्राहक राजा जागा हो!
ई-चलान कारवाईदरम्यान खासगी मोबाईलचा वापर थांबवण्याचे पोलीस महासंचालकांचे निर्देश
दीपक देशपांडे
वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी ई-चलान कारवाई करताना खासगी मोबाईल फोनवरून फोटो किंवा व्हिडिओ घेणे थांबवावे आणि शासनाद्वारे अधिकृतपणे मंजूर करण्यात आलेल्या **"रीअल टाइम मोबाईल चालान प्रणाली"**चा वापर करावा, असे स्पष्ट आदेश अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिले आहेत.
दिनांक ०२ मार्च २०२४ रोजी विधान भवन, मुंबई येथे मा. परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक संदर्भातील झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा मुद्दा चर्चेस आला होता. यावेळी नागरिकांच्या गोपनीयतेचा भंग होऊ नये आणि कोणताही गैरवापर होऊ नये, यासाठी हे निर्देश देण्यात आले आहेत ,यांचा संदर्भ देत पुन्हा एकदा नव्याने दिनांक ३ जूलै २०२५रोजी माननीय प्रविण साळुंके अप्पर पोलिस महासंचालक(वाहतूक ) महाराष्ट्र राज्य यांच्या स्वाक्षरीने एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
त्यातील प्रमुख निर्देश पुढीलप्रमाणे:
१. खासगी मोबाईलचा वापर निषिद्ध
कोणत्याही परिस्थितीत वाहतूक पोलीस अधिकारी किंवा अंमलदार यांनी स्वतःच्या मोबाईल फोनवरून ई-चलान कारवाईचे फोटो किंवा व्हिडिओ घेऊ नये.
२. केवळ अधिकृत प्रणालीचा वापर करावा
शासनाने उपलब्ध करून दिलेल्या Real-Time चालान प्रणालीचाच वापर करणे बंधनकारक आहे.
३. शिस्तभंगाची कारवाई
या निर्देशांचे उ्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जनतेने याची दखल घेऊन आपली कुणी फसवणूक तर करीत नाही ना? याबाबत खातरजमा करून दखल घेण्याचे आवाहन जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत यांनी केले आहे.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.
9403285344
✍️ddbatmi-m2m.blogspot.com ✍️

Comments
Post a Comment