विद्यार्थी मंत्रीमंडळ पदग्रहण सोहळा!

विद्यार्थी मंत्रीमंडळ पदग्रहण सोहळा!



मूल ,दीपक देशपांडे 

 दिनांक १९/०७/२०२५ ला माऊंट कॉन्व्हेंट अँड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स, मूल येथे शालेय परिषदेच्या वेगवेगळ्या पदांवर निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचा *पदग्रहण समारोह* पार पडला. संस्थेचे संस्थापक श्री. भाऊरावजी झाडें यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १२/०७/२०२५ ला प्राचार्या रीमा कांबळे  यांच्या देखरेखी खाली शालेय परिषदेचे निवडणूक कडक बंदोबस्तात मतपत्रिकेवर  घेण्यात आली. 

वर्ग ५ ते १२ पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क बजावता आला. निवडणुकीची मतमोजणी ही प्राचार्या  रीमा कांबळे यांच्या देखरेखी खाली दिनांक १८/०७/२०२५ रोजी  पूर्ण करण्यात आली तसेच या निवडणुकीचा निकाल दिनांक १९/०७/२०२५ ला जाहीर करून पदग्रहण सोहळा पार पाडण्यात आला. 

पदग्रहण सोहळ्याला प्राचार्या रीमा कांबळे  यांनी अध्यक्ष स्थान भूषविले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मूल नगर परिषदेच्या माजी नागराध्यक्ष  रत्नामाला प्र. भोयर, नवनियुक्त भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण ना. मोहुर्ले, तसेच भारती राखडे महिला जिल्हा प्रमुख शिवसेना ( शिंदे गट ) हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.

 कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून केली. विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करून,स्वागतगीत गायन व सुंदर नृत्याविष्कार सादर करून केले.

 मान्यवरांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना लोकशाही आणि निवडणुकीचे महत्व पटवून दिले. पदग्रहण सोहळ्यात विविध पदांचे खाते वाटप करण्यात आले,यात विद्यार्थी प्रतिनिधी (मुलांमधून )वेदांत आनंतुलवार तर विद्यार्थिनी प्रतिनिधी (मुलींची ) कु. सायली येनूरकर यांच्या गळ्यात विजयी माळ पडली. तसेच इतर पदे कु. तनवी भुरसे ( शैक्षणिक ), आरुषी भिमटे (सांस्कृतिक ), आरुषी नन्नेवार (पालक सभा ), तुषार आंबटकर (खेळ ), सर्वेश मुप्पीडवर (आरोग्य ), सिद्धांत चलाख (वाहतूक ) यांनी पदभार स्वीकारले. कार्यक्रमाचे संचालन पलक काळे मॅडम तसेच, श्री. वामन कवाडकर सर,श्री. भूपेंद्र मोटघरे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे उप मुख्याध्यापक श्री. अस्पाक सय्यद , कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख श्री. दुष्यंत गणवीर , प्रीती यामावार, अंशू येन्गन्टीवर, चैताली बावणे, सुनीता मोहबे, माधुरी पंधरे, रिंकू राठोड, हेमलता गेडाम, पायल शेंडे, इतर शिक्षक, ड्राइवर -कंडक्टर सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन व वंदेमातरम गायनसह झाला. मान्यवरांनी विध्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन शाळेचा निरोप घेतला.


  दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.