स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत मूल नगर परिषदेची मुसंडी.जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावर.
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत मूल नगर परिषदेची मुसंडी. जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावर.
मोठी बातमी:-
मूल , दीपक देशपांडे.
देशाला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी देशातील नागरीकांना स्वच्छतेची सवय लागावी आणि त्यामाध्यमातून जनतेचे आरोग्य निरोगी ठेवण्यास प्रोत्साहन मिळावे. याउद्देशाने भारत सरकारचे शहरी व ग्रामीण विकास मंत्रालय स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दरवर्षी विविध स्पर्धाचे आयोजन करते.
महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकिय निधी मधून नगर प्रशासनाने स्वच्छ आणि सुंदर शहर ठेवण्यासाठी मूल शहरात विविध योजना सोबतच सार्वजनिक शौचालयांची निर्मिती, घनकचरा व्यवस्थापन, घंटागाडी द्वारा कचरा संकलन, स्वच्छतेसंबंधी कर्मचाऱ्यांनी केलेली जनजागृती आणि त्याकरीता नागरीकांचा सक्रिय सहभाग मिळविण्यात नगर प्रशासनातील मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. त्यांच्याच परिश्रमातून केंद्र सरकारने घेतलेल्या २०२४ या वर्षीच्या स्वच्छ व सुंदर शहर स्पर्धेत मूल नगर परिषदेने जिल्हयात पहिला येण्याचा सन्मान मिळविल्याने समाधान व्यक्त केल्या जात आहे.
जिल्हयात अस्तित्वात असलेल्या विविध नगर परिषदांमधें मूल नगर परिषद माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे विधानसभा क्षेत्रात येते. त्यामूळे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे मार्गदर्शन आणि उपलब्ध होत असते तसेच विकास निधी खेचून आणण्यासाठी विशेष सहकार्य मिळत असते तसेच या नगरप्रशासनाचा कार्यभार सांभाळणाऱ्या आधिच्या सर्व मुख्याधिकारी यांनी केलेल्या प्रयत्नांचा देखील याप्रसंगी उल्लेख करणे आवश्यक आहे.
त्याची दखल घेत मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी नगरप्रशासनाचे प्रशासक व उपविभागीय अधिकारी अजय चरडे , यांचेसह मूल शहरातील आधीचे मुख्याधिकारी ,मूल शहरातील नागरिक व नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन करीत आभार मानले आहे.

Comments
Post a Comment