कलेक्टर होण्यासाठी फक्त एक रुपयात दुसऱ्या वर्गापासून प्रशिक्षण .

 कलेक्टर होण्यासाठी फक्त एक रुपयात 

दुसऱ्या वर्गापासून प्रशिक्षण 

पुस्तके विनामूल्य

दीपक देशपांडे.

 महाराष्ट्रातील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रशासनात जावेत यासाठी  अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीने मिशन आयएएस व लातूर येथील संस्कार प्रकाशनने जूनियर आयएएस परीक्षा हा उपक्रम गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर सुरू केलेला आहे .

केवळ नाममात्र एक रुपयाचे शुल्क घेऊन त्यामध्येच पुस्तकांचे विनामूल्य वितरण करण्यात येते .या परीक्षेचा परीक्षा फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे पेपर तपासणे त्यांना  गुणपत्रिका व प्रमाणपत्र देणे असे या उपक्रमाचे स्वरूप आहे .

डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी मिशन आयएएस अंतर्गत संस्कार प्रकाशनाच्या माध्यमातून हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही राबवते .या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या घरात असून हे सर्व विद्यार्थी  महाराष्ट्रातील विविध केंद्रावरून ही परीक्षा देत असतात.

 शालेय जीवनामध्ये स्पर्धा परीक्षेचा संस्कार मुलांमध्ये रुजू व्हावा यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गाची स्पर्धा परीक्षेची पुस्तके विनामूल्य देण्यात येतात .

अमरावतीची डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी ही भारतातील नामवंत संस्था असून या संस्थेला आतापर्यंत ३७३ आय ए एस आयपीएस सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या आहेत .संस्थेने आतापर्यंत संपूर्ण भारतात १६१७८ विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतलेल्या आहेत ..या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पालकांनी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी अधिक माहितीसाठी डॉ.पंजाबराव देशमुख अकादमीचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्याशी  संपर्क साधावा. उच्च शिक्षणमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील व माजी उच्च शिक्षण मंत्री श्री उदय सामंत व शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे व माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनीही या अभिनव उपक्रमाची पाठराखण केली असून प्रत्येक महाविद्यालयांमध्ये करियर कट्टा व प्रत्येक शाळेमध्ये मिशन आयएएस प्रारंभ करण्यासाठी त्यांनी रितसर पत्र काढून या उपक्रमाची प्रशंसा केलेली आहे .

महाराष्ट्रातील शाळा आणि महाविद्यालयात बरोबरच हा उपक्रम गुजरात आणि राजस्थान या राज्यातही प्रारंभ झालेला आहे .तेथे  देखील नाम मात्र एक रुपया एवढे अल्प शुल्क आकारण्यात येते .एक रुपयामध्ये स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण एवढ्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतात देणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी सारखी दुसरी संस्था आज तरी उपलब्ध नाही .

विशेष म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची कलेक्टर होण्यासाठी जी परीक्षा द्यावी लागते त्या परीक्षेची तयारी या संस्थेमध्ये दिल्लीच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य करून देण्यात येते .या संस्थेचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांचे अपर मुख्य सचिव मा. श्री विकास खारगे आय ए एस यांनी  पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे बारा मे २००० या तारखेला अमरावतीच्या विदर्भ युथ वेल फेअर सोसायटीच्या श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या जवळील दंत महाविद्यालयात केलेले आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रमध्ये  मिशनआय ए एस या उपक्रमाची चर्चा असून सर्व जिल्ह्यातून या उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद प्राप्त होत आहे .

प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे

 संचालक,मिशन आयएएस 

अमरावती कॅम्प 

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

             9403285344.               ✍️ Ddbatmi-m2M ✍️

             

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.