ग्राहक हितासाठी सर्पमित्रांची नाव व संपर्क क्रमांकाची यादी नागपूर जिल्ह्यात लागू शकते तर इतर जिल्ह्यांत कां नाही?:- दीपक देशपांडे.

"ग्राहक राजा जागा हो"

ग्राहक हितासाठी सर्पमित्रांची नाव व संपर्क क्रमांकाची यादी नागपूर जिल्ह्यात लागू शकते तर इतर जिल्ह्यांत कां नाही?:-दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत यांची विचारणा.


पावसाळा सुरू झाला की पाताळात राहणारे सर्पादी  प्राणी पृथ्वीतलावर येतात आणि मनुष्य प्राण्याला दंश करतात परिणामी मोठ्या प्रमाणात वेळेवर औषधोपचार झाला नाही तर मनुष्य प्राणी आपला जीव गमावतात.

कधी कधी त्या दंश झालेल्या मनुष्याला दवाखान्यात दाखल करायला उशीर होतो तर कधी दवाखान्यात दाखल करुनही योग्य माहितीच्या व उपचारा अभावामुळे औषधोपचार करताना केलेल्या दिरंगाई मुळे सुद्धा प्राण गमवावे लागतात,हे प्रकार ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत सर्वदूर अनुभवायला मिळतात. त्यामुळे मनुष्याला प्राणही गमवावे लागतात, आणि त्यानंतर नातेवाईक आणि वैद्यकीय अधिकारी याच्यात मोठे वादही होतात.

हे वाद होऊ नये यासाठी वैद्यकीय अधिकारी यांचे सोबतच त्या परिसरात कार्यरत  प्रशिक्षित सर्पमित्र यांची नावे व संपर्क क्रमांक आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक स्वास्थ्य केन्द्र व उपजिल्हा रुग्णालय परिसरात ठळक अक्षरात लावण्यात आले  आणि त्यांना संपर्क साधून एक सल्ला घेऊन औषधोपचार केला तर अशा दंश झालेल्या कित्येक रुग्णांचे प्राण वाचविले जाऊ शकतात .

अशी यादी आम्हाला नागपूर  जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात आढळून आली ,असा फलक नागपूर जिल्ह्यात आरोग्य  केंद्रात जर लावली जाऊ शकते तर ती विदर्भ व राज्यातील प्रत्येक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र तथा उपजिल्हा रुग्णालयात लागली पाहिजे..जेणेकरून सर्प दंशाच्या रुग्णाला  वेळेवर योग्य उपचार मिळाले पाहिजे.... अशी मागणी दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत यांनी  महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागाकडे केली आहे.

या आशयाचे निवेदन  जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांताचे वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांचेकडे पाठविण्यात आले असून यावर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली आहे.

 उमेश झिरे सर्पमित्र यांचे याबाबत  मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणतात:-मला मागील वीस वर्षाचा अनुभव आहे ..असे भरपूर डॉक्टर येतात मूल उपजिल्हा रुग्णालयात जे MBBS आहेत किंवा BAMS आहेत.. त्यातील काहींचे विचार असे असतात की हे कोण आम्हाला सांगणार..हा साप विषारी आहे की बिनविषारी? 

..आम्ही MBBS आहोत MD  आहोत..,हे कोण आम्हाला सांगणारे ....आणि तिथेच त्यांचा ईगो हर्ट होतो.. 

त्यामुळे अनेक सर्पदंशाच्या रूग्णांचा मृत्यू होतो  तो केवळ चुकीच्या उपचारांमुळे ..‌‌. मात्र सर्पमित्रांना याबाबत अचूक माहिती असते की दंश केलेला साप हा विषारी आहे की बिनविषारी... फक्त गरज आहे ती  जिल्ह्यातील कोणत्याही रूग्णालयात सर्प दंशाचा रूग्ण आला की स्थानिक रुग्णालयातून सर्पमित्राला कॉल आला पाहिजे....जसा मूल उपजिल्हा रुग्णालयातुन येतो.. आणि चंद्रपूरसह प्रत्येक   जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयात सर्पमित्रांची यादी त्यांच्या मोबाईल नंबर सहीत लागली पाहिजे आणि वेळीच  सर्पमित्रांना पाचारण करुन त्यांचे मत विचारात घेऊन औषधोपचार केला पाहिजे, शासनाने मोठ्या प्रमाणात औषधसाठा उपलब्ध करून दिला आहे परंतु योग्य ते निदान वेळेवर झाले पाहिजे.... असे स्पष्ट मत मूल चे सर्पमित्र उमेश झिरे यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत वार्तालाप करताना व्यक्त केले आहे.


दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.