कृषी महाविद्यालय मूल येथे कृषीदिन साजरा
कृषी महाविद्यालय मूल येथे कृषीदिन साजरा
मूल, दीपक देशपांडे कृषी महाविद्यालय मूल दिनांक *१ जुलै २०२५* ला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत वसंतराव नाईक जयंती निमित्य “कृषी दिन” साजरा करण्यात आला. याप्रसंगी महानायक दिवंगत वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी हरित क्रांतीचे प्रणेते व सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे महानायक वसंतराव नाईक यांच्या कृषी मधील योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली, याच कृषी दिनाचे औचित्य साधून वृक्ष लागवड उपक्रम महाविद्यालयामध्ये राबविण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मूलचे *श्री प्रवीणभाऊ मोहुर्ले, भाजप शहर अध्यक्ष, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक श्री अविनाशभाऊ जगताप, व माजी नगरसेविका श्रीमती मनीषाताई गांडलेवार* तसेच *महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, इतर कर्मचारी* आणि *विद्यार्थी* उपस्थित होते.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment