केतन जुनघरेंचा वाढदिवस रक्तदान करून केल साजरा.
केतन जुनघरेंचा वाढदिवस रक्तदान करून केल साजरा
२१ रक्तदात्यांनी केले रक्तदान : केतन जुनघरे मित्र परिवाराचे आयोजन

राजुरा :-न्यूजब्युरो
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज मोठ्या प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. ही जाणीव ठेवून राजुरा येथिल युवा सामाजिक कार्यकर्ता केतन जुनघरे यांच्या वाढदिवसा निमित्य कोणताही गाजावाजा न करता त्यांच्या मित्र परिवाराने राष्ट्रीय कार्यात हातभार लावण्यासाठी मागील सहा वर्षापासून वाढदिवसा निमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आहे. या वाढदिवसाला २१ रक्तदात्यांनी रक्तदान करीत केतन जुनघरे यांना शुभेच्छा दिल्या.
मानवाने विज्ञानातील प्रगतीच्या जोरावर सर्व काही साध्य केले आहे. मात्र, रक्त निर्मिती करता आलेली नाही. अशातच राज्यात तसेच जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेत युवा सामाजिक कार्यकर्ता केतन जुनघरे यांच्या मित्र परीवाराने रविवारी (दि.१३) हनुमान मंदिर साईनगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. केतन जुनघरे यांनी स्वतः ३८ वेळा रक्तदान केले आहे. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असून वाढदिवसानिमित्त हे सामाजिक कार्य होत असल्याने सर्व स्तरांतून या शिबिराचे स्वागत केले.
रक्तदान शिबिराचे उदघाटक जेष्ठ नागरिक आनंदराव ताजणे व केंद्र प्रमुख प्रभाकर जुनघरे यांनी केले. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष निखिल चांडक, सारंग गिरसावले, सिंधी ग्राम पंचायतीचे उपसरपंच रामभाऊ ढूमने, शंतनू धोटे, राजकुमार डाखरे, प्रणय लांडे, सुजित कावळे, अंकुश मस्की, हर्षल भोयर, अतुल चहारे, वैभव महाकुलकरसह अन्य युवामित्र परिवार उपस्थित होते.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment