शेतकरी शेतमजुरांच्या मुलांच्या सर्वांगीण विकासात स्व.ॲड.वि.तू.नागपुरे यांचे मोलाचे स्थान. प्राचार्य डॉ.अनिल चिताडे..
शेतकरी शेतमजुरांच्या मुलांच्या सर्वांगीण विकासात स्व.ॲड.वि.तू.नागपुरे यांचे मोलाचे स्थान. प्राचार्य डॉ.अनिल चिताडे.
मूल दीपक देशपांडे
स्व. वि.तू.नागपुरे सामाजिक कार्य व सेवा प्रतिष्ठान मूल च्या वतीने स्व. वि. तु नागपुरे यांची जयंती व कृषी पर्यावरण दिन म्हणून कर्मवीर महाविद्यालय मूल येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दलितमित्र माजी संसद सदस्य स्व वि.तू नागपुरे यांच्या जयंतीच्या निमित्याने विचारमंचावर अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. अँड. अनिल वैरागडे, उद्घाटक मा. डॉ. अनिल चिताडे प्राचार्य राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर प्रमुख अतिथी म्हणून मा. मृदुला मोरे तहसीलदार मूल, मा. शशिकांत धर्माधिकारी सचिव शि.प्र.मंडळ मूल तथा अध्यक्ष स्व.वि.तू नागपुरे सामाजिक कार्य व सेवा प्रतिष्ठान मूल मा. प्रणव वैरागडे उपाध्यक्ष शि. प्र. मंडळ मूल , प्र.गटशिक्षणाधिकारी मा . गुजनवार मॅडम , संस्थेचे सहसचिव मा. ते. क.कापगते, मा. प्र.य.पुलकवार आदी मान्यवर उपस्थित होते. सोबतच संस्थांतर्गत शाळा व महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गोंडवाना गीत सादर करून करण्यात आली यानंतर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके यांनी केले प्रास्ताविकातून स्व वि तू नागपुरे यांच्या जिवनचरित्रावर त्यांनी प्रकाश टाकला यानंतर कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे सचिव मा.. शशिकांत धर्माधिकारी साहेब यांनी जयंतीच्या निमित्याने नागपुरे साहेब यांच्या सहवासातील क्षणांची आठवण आपल्या भाषणातून उपस्थितांना करून दिली. यानंतर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणुन उपस्थित मा. प्राचार्य डॉ अनिल चिताडे यांनी स्व वि तू नागपुरे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करुन स्व. वि . तू. नागपुरे यांच्या प्रेरणेतून आज हजारो शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांचा उद्धार झाला असे मत व्यक्त करून संस्थेच्या भविष्यासाठी शुभेच्या दिल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात अँड. अनिल वैरागडे यांनी स्व.व.तू . नागपुरे यांनी केलेल्या निस्वार्थ कार्याचा आढावा घेतला, व संस्थेचे माजी अध्यक्ष ॲड.बाबासाहेब वासाडे यांचेपण कार्य संस्थेसाठी मोलाचे आहेत असे मत व्यक्त करून त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली.कृषी व पर्यावरण दिनाचे औचित्याने, बोरचांदली येथील श्री दिनकरराव रामभाऊजी येणुगवार (आदर्श प्रगतिशील शेतकरी), श्री. दिनेश माणिकराव बनकर व श्री प्रशांत मधुकर गटलेवार (आदर्श शिक्षक) , श्री. तुळशीदास बालाजी कुनघाडकर (अधिक्षक, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी), संस्थांतर्गत सेवानिवृत कर्मचारी व गुणवंत विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्या देण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन डॉ. जी. एस. आगलावे यांनी केले तर आभार श्री.महेश कुमरे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वितेसाठी पा.दिनेश बनकर, प्रा.घनश्याम डोंगरवार, प्रा.अनिल शेलेकर, प्रा.राहुल बोधे, प्रा. नीरज चणे, प्रा.सागर मासिरकर, प्रा . सिकंदर लेनगुरे,डॉ.उज्वला कापगते, डॉ, केवळ कराडे, डॉ, संदीप मांडवगडे , डॉ, गणेश गायकवाड, प्रा.गजानन घूमडे, प्रा.प्रवीण उपरे, डॉ.अतुल पारखी यांनी विशेष प्रयत्न केले.जयंतीचा कार्यक्रम यशस्वितेसाठी संस्थांतर्गत येणाऱ्या सर्व शाळा महाविद्यालयातील प्राचार्य व शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment