एका महिलेसह चार तोतये अटकेत!पोलीस स्टेशन मूल ची उल्लेखनिय कामगिरी.

एका  महिलेसह चार तोतये अटकेत!पोलीस स्टेशन मूल ची उल्लेखनिय कामगिरी



मूल, दीपक देशपांडे 

चंद्रपुर जिल्हयात व पोलीस स्टेशन मूल कार्यक्षेत्राअंतर्गत बनावट पोलीस व पत्रकार असल्याची बतावणी करून खंडणी वसुल करणारी टोळी जेरबंद करण्यात यश.

मूल पोलीस स्टेशन अंतर्गत फिर्यादी सुरेश लक्ष्मण गणमेनवार वय ३६ वर्ष रा चिरोली ता मूल जि चंद्रपुर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपक व कलम :-२५३ / २०२५, कलम ३०८ (२), २०४, ३ (५) बि एन एस अनुसार  गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  घटना तारीख व वेळ :-१) दिनांक - ०३/०७/२०२५ चे १६.३० वा ते १७:०० वाजता दरम्यान आणि दाखल तारीख व वेळ  २) दिनांक - १३/०७/२०२५ चे २१ : ४४ वाजता

घटनास्थळ:-मौजा चिरोली, ता मूल जिल्हा चंद्रपुर येथे 

आरोपी नाव:-१) बादल दुर्गाप्रसाद दुबे वय ३६ वर्ष रा रेंगेपार ता साकोली जि भंडारा, ह मु भिवापुर वार्ड चंद्रपुर २) सौ संगीता बादल दुबे वय २७ वर्ष रा रेंगेपार ता साकोली जि भंडारा, ह मु भिवापुर वार्ड चंद्रपुर ३) अजय विजय उईके वय ३१ वर्ष रा गजानन मंदीर रोड, शितला माता मंदीर च्या मागे चंद्रपुर ४) देवेंद्र चरणदास सोनवणे वय ३० वर्ष रा निलज, ता साकोली जि भंडारा, ह मु भिवापुर वार्ड चंद्रपुर यांचेजवळ मिळुन आलेला माल:-१३,१०,०००/- रू चे मुददेमाल जप्त करण्यात आला असून या जप्त करण्यात आलेल्या मालात १)एक पांढ-या रंगाची अर्टीका कार क्र. एम एच ३४, सि जे ५८२४ किं अं १२,५०,०००/-रू २) दोन विवो कंपनीचे व एक ओपो कंपनीचा मोबाईल किंमत १५,०००/- रू प्रती किंमत अंदाजे ४५,०००/- रू ३) नगदी १५,००० /- रु  असा एकुण १३, १०,०००/- रू चा माल जप्त करण्यात आला आहे.

 याबाबत ची हकीकत :-याप्रमाणे आहे कि, यातील नमुद आरोपींतांनी संगणमत करून दिनांक ०३/०७/२०२५ रोजी पोलीस स्टेशन मूल हद्दीतील मौजा चिरोली येथे फिर्यादीचे घरी एक पांढ-या रंगाची अर्टीका कार क्र. एम एच ३४, सि जे ५८२४ नी जावुन पोलीस भरारी पथक चंद्रपुर असल्याची बतावणी करून त्याचे घरी मिळुन आलेल्या विनापरवाना दारू वर कार्यवाही करण्याचे धाक दाखवुन त्यास १५,०००/- रू याची मागणी करून तडजोड अंती १०,०००/- रूची खंडणी वसुल केले तसेच मौजा डोंगरगाव ता मूल येथील नामे एजाज शेख ईब्राईम शेख याचे अंडा आमलेट दुकानात जावुन त्याचे दुकानात दारू पिणारे व्यक्ती मिळुन आल्याने त्याचे विरुध्द कार्यवाही करण्याचे धाक दाखवुन त्यास १०,०००/- रू ची मागणी करून तडजोड अंती ५,०००/- रू ची खंडणी वसुल केले अश्या फिर्यादीचे लेखी तक्रारवरून पो स्टे मूल येथे अप क २५३ / २०२५, कलम ३०८ (२), २०४,३ (५) बि एन एस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता ,या घटनेची चौकशी करता खालील बाबी उघड झाल्या .

सदर गुन्हयात आरोपी क्र ०१ ते ०३ पत्रकार असुन अटक करण्यात आले असुन त्यांचे कडुन १) एक पांढ-या रंगाची अर्टीका कार क्र. एम एच ३४, सि जे ५८२४ किं अं १२,५०,००० /- रू २) दोन विवो कंपनीचे व एक ओपो कंपनीचे मोबाईल प्रत्येकी किंमत १५,०००/- रू असा एकुण अंदाजे ४५,०००/-रू, ३) नगदी १५,०००/-रू असा एकुण १३,१०,०००/-रू चा माल जप्त करण्यात आले असुन पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

या गुन्ह्याचा तपास करताना 

१) मा मुमक्का सुदर्शन जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रपुर

२) मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव (अतिरिक्त कार्यभार उपविभाग मूल) आणि 

३) पोनि विजय राठोड (प्रभारी अधिकारी पो. स्टे. मूल) यांचे मार्गदर्शनात

पोलीस स्टेशन मूलचे

१) सपोनि सुबोध वंजारी,

२) पोहवा भोजराज मुंडरे, ब न २३९७

३) पोहवा जमीरखान पठाण, ब न २४९

४) नापोअं चिमाजी देवकते ब न २४९७

५) पोअं नरेश कोडापे, बन १८३

 ६) पोअं शंकर बोरसरे ब न १२३२

७) पोअं संदिप चुधरी ब न १३९  इत्यादी   अधिकारी व अंमलदार यांनी कार्यवाही करुन तपासाअंती आरोपी एका महिलेसह चार  तोतयांना मुद्देमालासह अटक केली व एका उल्लेखनीय कामगिरीसह स्वतः चे नावाने एक  यशस्वी नोंद केली आहे.


दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

    ✍️Ddbatmi-m2M✍️



 



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.