ब्रेकिंग न्यूज. अंगणवाडीतून वाटप होणारे धान्य व पोषण आहार निकृष्ट दर्जाचे?

 ब्रेकिंग न्यूज.

अंगणवाडीतून वाटप होणारे धान्य व पोषण आहार निकृष्ट दर्जाचे?

आमदारांकडे तक्रार.

मूल,दीपक देशपांडे 

मूल तालुक्यातील मौजा विरई पेट येथील अंगणवाडी मार्फत ६ महीने ते ३ वर्षाच्या या बालकांना तसेच गरोदर माता यांना देण्यात येणारा एनर्जी डेन्स, तुर दाळ खिचडी प्रिमीक्स मल्टी मिक्स सिरियल्स अॅन्ड प्रोटीन्स प्रमिक्स एनर्जी डेन्स मुंग दाळ खिचडी प्रिमिक्स हा माल अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याने सदरचा चालु असलेला पोषण आहार देणे बंद करून खाण्याजोगे असलेला चांगला पोषण आहार देण्याबाबतची तक्रारवजा मागणी सौ.अश्विनी प्रशा़ंत निकोडे यांनी मूल बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या( मोबाईल ऑफिस) फिरत्या कार्यालयात सादर केली आहे.

आपल्या तक्रारीत त्या पुढे म्हणतात,माझा मुलगा विरई पेट क्रमांक २  या अंगणवाडीत नोंदणीकृत बालक असून शासनाच्या निर्देशानुसार या अंगणवाडीत वाटप होणारे साहित्य हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे व अत्यंत घाण वास येत असणारे असल्याने ते धान्य व साहित्य पौष्टिक कसे काय असू शकते, परिणामी ते साहित्य तातडीने बदलून दूसरे ताजे व सकस धान्य पुरविण्यात यावे यासाठी हे तक्रार वजा निवेदन सादर केल्याचे आमच्याशी वार्तालाप करताना स्पष्ट केले.

एकूणच छोट्या बालकांच्या व गरोदर मातांच्या जिविताशी हा तर खेळ चालविला असल्याची बाब यामुळे पुढे येत असून हा पोषण आहार आहे की ... ह्यामुळे प्रकृती बिघडवण्याचा प्रकार सुरू आहे?असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला असून असे खराब धान्य पोषण आहाराचे नावाने न पुरवता उत्कृष्ट दर्जाचे धान्य व पोषणआहाराचा पुरवठा करण्याची त्यांनी निवेदन सादर करुन व ते धान्य प्रत्यक्ष आम्हाला दाखवून उपरोक्त मागणी केली आहे.

आता शासकीय यंत्रणा यावर काय प्रतिक्रिया देते आणि कोणती कारवाई करते याकडे विरई पेट व परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.

आम्ही महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो होऊ शकला नाही, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही. 


दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.