गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार :-विद्यार्थ्यांनी आपली बलस्थाने ओळखून योग्य क्षेत्र निवडावे – गणेश शिंदे यांचे मार्गदर्शन

  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा:-

विद्यार्थ्यांनी आपली बलस्थाने ओळखून योग्य क्षेत्र निवडावे – गणेश शिंदे 

मूल –दीपक देशपांडे 

विद्यार्थ्यांनी आपली बलस्थाने ओळखली पाहिजेत व त्याच दिशेने योग्य करीयर निवडून आत्मविश्वासाने वाटचाल केली पाहिजे, असा मौलिक सल्ला ख्यातनाम व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शक श्री. गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला. मूल येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी अभिनंदन व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.

हा कार्यक्रम भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने स्वर्गीय मा.सा. कन्नमवार सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला, तेंव्हा बाहेर जोरदार पाऊस सुरू झाला होता.

आपल्या भाषणात गणेश शिंदे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी फक्त गुणांवर भर न देता, स्वतःच्या आवडी, कौशल्ये, व अंतर्गत क्षमतांचा विचार करून करिअर निवडले पाहिजे. यामुळे केवळ यश नाही तर समाधानही मिळेल.”“आपल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन द्या. शिक्षण हेच त्यांचे भविष्य उज्वल करेल.”असेही शिंदे यांनी विशेषतः पालकांना उद्देशून सांगितले .

कार्यक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना एक प्रेरणादायी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, “मूल शहराचा विद्यार्थी भविष्यात देशाचा राष्ट्रपती, आर्मी चिफ किंवा वैज्ञानिक होईल, असा विश्वास वाटतो. येथे खूप प्रतिभावान विद्यार्थी आहेत. त्यांनी देशात नाव कमवावे, हीच अपेक्षा आहे.”

कार्यक्रमात दहावी व बारावी मध्ये विशेष यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाला संध्याताई गुरनूले, प्रभाकर भोयर, मंगेश गुलवाडे, हरिष शर्मा, शहर अध्यक्ष प्रविण मोहूळे, नंदू रणदिवे, अविनाश जगताप, प्रा. रत्नमाला भोयर, किशोर कापगते, प्रा. किरण कापगते, उषा शेंडे, माजी प्राचार्य शशिकांत धर्माधिकारी, गजानन नागापूरे, जिरकुंटवार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भाजपा शिक्षक व महिला आघाडीचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत सुरळीतपणे करण्यात आले होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि प्रभावी मार्गदर्शनामुळे उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये  एक आगळेवेगळे चैतन्य निर्माण झाले होते.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.