कृषि महाविद्यालय, मूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

 कृषि  महाविद्यालय, मूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा



मूल , दीपक देशपांडे.

२१ जून २०२५: *राष्ट्रीय सेवा योजना, कृषी महाविद्यालय, मूल यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन दिनांक २१ जून २०२५ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण करणे, मानसिक व शारीरिक आरोग्याची जाणीव करून देणे आणि योगाची वैज्ञानिक पद्धतीने माहिती देणे, या उद्देशाने करण्यात आले होते.

               कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पूजन करून करण्यात आली. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे *सहयोगी अधिष्ठाता मा. डॉ. विलास जी. अतकरे* यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमासाठी दोन मान्यवर पाहुण्यांना विशेष मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते.  त्यामध्ये *श्री. रविद्र मानधाळे  व श्रीमती सविता मानधाळे*  हे योग प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणुन लाभले. 

या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना योगाचे इतिहास, महत्त्व, आधुनिक जीवनातील गरज, तसेच मानसिक तणावावर योगाचा होणारा प्रभाव याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी सूर्यनमस्कार, प्राणायाम, ताडासन, भुजंगासन, शवासन इत्यादी योगासने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष करून दाखवली. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात योगासने करून प्रत्यक्ष अनुभव घेतला.

कार्यक्रमात ७०  पेक्षा अधिक विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी सहभाग घेतला. सर्वांनी एकत्र येऊन योगाभ्यास केला आणि ‘योग हा फक्त व्यायाम नसून जीवनशैली आहे’ हा संदेश आत्मसात केला.

मान्यवर पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालायचे सहयोगी अधिस्थातांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी पाहुण्यांचे मोलाचे मार्गदर्शन अत्यंत प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी *सहयोगी अधिष्ठाता  मा. डॉ. विलास जी. अतकरे* यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत योग हा केवळ २१ जूनपुरता मर्यादित न ठेवता तो दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *सहाय्यक प्राध्यापक कु. मनीषा लवणकर*  यांनी केले आणि आभारप्रदर्शन *डॉ. खुशाल राठोड*  यांनी केले. या कार्यक्रमाला *डॉ. रमाकांत गजभिये, प्राध्यापक उद्यानविद्या, श्री. नागेश नवघरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी* तथा इतर प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची जाणीव, तसेच नवीन ऊर्जा व सकारात्मकता यांचा प्रसार झाला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या युनिटच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.