आनंदात साजरा झाला शाळा प्रवेशोत्सव .
आनंदात साजरा झाला शाळा प्रवेशोत्सव .
मूल, दीपक देशपांडे.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गडीसुर्ला येथे शाळेचा पहिला दिवस "शाळा प्रवेशोत्सव दिन" म्हणून संपन्न झाला.
दिनांक २३/०६/२०२५ सोमवार ला संपूर्ण विदर्भातील शाळांचा पहिला दिवस,अतिशय उत्साहात मुलांनी साजरा केला ,याप्रसंगी उपस्थित मृदुला मोरे तहसीलदार मूल यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच शालेय पुस्तकांचे वाटपही त्यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना त्यांनी आपल्या अनुभवांचे कथन केले व विद्यार्थ्यांना भावी जीवनातील यशाचे गमक ही सांगितले , आणि शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शारदाताई येनुरकर सरपंच , विनोदभाऊ कावळे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांचेही प्रसंगोचीत मार्गदर्शन लाभले.
सखिमंच गडीसूर्ला चे दिपाताई मुप्पिडवार , करिष्माताई वाढई, विशाखा दुर्गे, सोनाली शेंडे, निलोफर शेख, माधुरी रेपाकूलवार , वैशाली आंबटकर दिक्षाताई मोहूर्ले,आदी ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुरेश टिकले मुख्याध्यापक यांनी केले.सुत्र संचालन श्री नवनित कंदालवार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री प्रशांत कवासे यांनी केले.
सर्व विद्यार्थ्याना सुग्रास भोजन देण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्विते साठी श्री दुधे, श्री श्रीगुरवार, , श्री चौधरी कू. धकाते यांनी प्रयत्न केले.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️ Ddbatmi-m2M ✍️
.

Comments
Post a Comment