मोठी बातमी वाघाच्या हल्ल्यात एक ठार एक बेपत्ता.
मोठी बातमी
वाघाच्या हल्ल्यात एक ठार एक बेपत्ता,शोध सुरू.
मूल तालुक्यातील महारोगी सेवा समिती, वरोरा च्या सोमनाथ प्रकल्प येथील जेष्ठ कार्यकर्ते जयदेव करनकर यांचा वाघाच्या हल्यात मृत्यू झालेला असून जयदेव आपल्या राहात्या घराच्या परिसरातील मागील बाजूस काम करीत असताना दि.८/६/२५ रोजी संध्याकाळी दाट झाडा झूडूपात दडलेल्या वाघाने हल्ला केल्याने निर्मल निकेतन वसाहती त राहणाऱ्या कुष्ठरोगी,अपंग, वृद्ध रहिवाशांमधे भितीचे वातावरण झाले आहे , शोधाशोध करुनही रात्रीपर्यंत त्यांचा पत्ता लागला नाही शोध पथकाला आज सकाळी काही मांसाचा गोळा आणि एक तुटका अवयव एवढे सापडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे वसाहतीत राहणाऱ्या रुग्णांनी व रहिवाशांनी वनविभागाने सोमनाथ मधील वसाहती सभोवताली जाळी चे कुपंन घालून द्यावे अशी मागणी रहिवासी लोक करित आहेत. ही जागा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येते.
तर मूल तालुक्यातील मौजा सुशी दाबगाव येथील काही महिला जंगलात सरपन गोळा करण्यासाठी गेल्या असताना वाघाच्या आवाजाने घाबरून बऱ्याच महिला एकत्र येऊन मुख्य मार्गाने गावाच्या दिशेने परतल्या परंतू एक महिला घाबरून जंगलाच्या दिशेने पळत सुटली तीचा शोध सुरू आहे मात्र ती शोध पथकाला सापडली नव्हती हे जंगल एफडीसिएमच्या चिचपल्ली वनक्षेत्रात येत असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले असून नरभक्षक वाघाने त्या महिलेला हल्ला करुन ओढून जंगलात नेले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
वाघाच्या हल्ल्यात अशाप्रकारे मानवावर सुरू असलेल्या जिवघेण्या प्रकाराबाबत तिव्र असंतोष निर्माण झाला असून त्यात कित्येकांचा जीव घेतला गेला आहे तर वास्तव्यास असलेल्या नागरिकांत प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजना हा केवळ दिखावा तर नाही ना?अशी शंका व्यक्त केली जात आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment