जागृत ग्राहक राजा तर्फे नवनियुक्त नायब तहसीलदार मूल यांचे स्वागत व अभिनंदन.

 जागृत ग्राहक राजा तर्फे नवनियुक्त नायब तहसीलदार मूल यांचे स्वागत व अभिनंदन.

सोमवार दिनांक ९/०६/२०२५रोजी मूल तहसील कार्यालयात नव्याने नियुक्त करण्यात आलेले निवासी नायब तहसीलदार दिनेश पवार यांची आज  जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट घेतली आणि त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले, आणि मूल तालुक्यातील नागरिकांना यथायोग्य सहकार्य व मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

त्यानंतर नवनियुक्त नायब तहसीलदार श्री.प्रविण चिडे यांचीही भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचेही स्वागत व अभिनंदन केले,व संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी व एकुणच तालुक्यातील राशनकार्डधारक लाभार्थ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

दोन्ही नवनियुक्त नायब तहसीलदार महोदयांनी जनता, सामाजिक संघटना वा लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात सलोखा व सहकार्य असल्यास न्याय देणे व ग्राहक हित जपणे अधिक सुलभ होईल असे मत व्यक्त केले,व परस्पर सहकार्याने येणाऱ्या अडचणी सोडवता येतील ही अपेक्षा व्यक्त केली.

साधकबाधक चर्चेत पवार साहेब चिमूर वरुन बदली अंतर्गत मूल येथे निवासी नायब तहसीलदार म्हणून नंदकिशोर कुंभारे यांच्या जागी रुजू झाले आहेत कारण कुंभारे साहेबांची वडसा येथे बदली झाली आहे.तर चिडे साहेब कोरपना  येथून ओंकार ठाकरे यांच्या जागी रुजू झाले आहेत आणि ठाकरे साहेबांची चंद्रपूर येथे बदली झाली आहे. तर निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार यशवंत पवार यांचीही बदली झाली असल्यामुळे ती जागा अजूनही रिक्त आहे.

दोन्ही नवनियुक्त नायब तहसीलदार यांनी पदभार स्वीकारला असल्याने मूल येथील एकुण तीन नायब तहसीलदार  यांचे रिक्त पदांपैकी दोन रिक्त जागा भरल्यामुळे मूल तहसील कार्यालयात असलेल्या जमा पेंडींग प्रकरणांचा निपटारा करण्यात लवकरच यश मिळेल असा विश्वास जागृत ग्राहक राजा या संघटनेच्या वतीने दीपक देशपांडे यांनी व्यक्त केला आहे .

या भेटीत जागृत ग्राहक राजा संघटनेचे दीपक देशपांडे यांचे सोबत प्रमोद मशाखेत्री व विवेक मुनगेलवार हे उपस्थित होते.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.