नागभीडचे स्वच्छतागृह कधी स्वच्छ होणार?

नागभीडचे स्वच्छतागृह कधी स्वच्छ होणार? तातडीने स्वच्छ राखण्यात यावे:-दीपक देशपांडे, अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत यांची मागणी.

लक्षवेधी चंद्रपूर नागपूर मार्गावरील नागभीड या गावाबाबत फारसे ऐतिहासिक पुरावे सापडत नाहीत, पण आजच्या बाजार चौकातील जनता विद्यालयाच्या इमारतीसमोर असलेल्या दर्ग्याजवळ व अन्य तीन ठिकाणी, असे एकूण चार बुरूज होते आणि त्याला धरून एक परकोट असावा. त्याचे अवशेष शिवटेकडीवरील बिनतारी संदेशाच्या टॉवरजवळ असल्याचे व टेकडीच्या पायथ्याशी गोंड राजा आणि राणीची समाधी असल्याचे सांगितले जाते. मृतदेह पुरल्यानंतर डोक्याच्या बाजूला मोठा दगड ठेवला जातो. तशा प्रचंड मोठय़ा शीळा वर्षांनुवर्षांपासून शिवटेकडीच्या परिसरात दिसतात.

‘नागभीड’ या नावाला ‘नाग’ सापांची भीड (गर्दी) किंवा नाग लोकांची वस्ती वा नाग संस्कृतीची पार्श्र्वभूमी, असा काही ऐतिहासिक संदर्भ असल्याचे सांगणारी व्यक्ती भेटली नाही. तसेच हयात सुद्धा नाही, पण या भागात घनदाट जंगले होती. त्यात वन्यप्राण्यांप्रमाणेच नाग व सापांचाही सुळसुळाट असावा व त्यावरून या गावाला नागभीड हे नाव पडले असावे, असा तर्क व्यक्त करायला वाव आहे.

नागपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हा, व जिल्हय़ाचे ठिकाण चंद्रपूर व यवतमाळ या सर्वांना शंभर किलोमीटरच्या परिघाने जोडणारे व गोंदिया, वर्धा, यवतमाळ, अमरावती जिल्हय़ांच्या ठिकाणी जाण्यासाठी केंद्रस्थान आणि पूर्व विदर्भाचे मध्यवर्ती ठिकाण असलेले नागभीड आजही विकासाच्या प्रतिक्षेत असलेले गाव आहे.

नागभीडला ब्रिटिश काळापासून पोलीस ठाणे, वनपरिक्षेत्र कार्यालय आहे. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, सुतिकागृह, सरकारी सिनिअर बेसिक शाळा, आता उच्च श्रेणी जि.प. प्राथमिक शाळा, ६ हायस्कूल, ३ कनिष्ठ महाविद्यालये, ३ वरिष्ठ महाविद्यालये, ३ कॉन्व्हेंट, एक जि.प.प्राथमिक उर्दू शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था,व अंगणवाडय़ांनी संपन्न आहे.

घोडाझरी प्रकल्प : हे निसर्गरम्य स्थळ क वर्ग पर्यटन स्थळाच्या यादीवर आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या ‘घोडाझरी’ या नवीन अभयारण्याच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली. या अभयारण्याचे प्रस्तावित क्षेत्र सुमारे १५९.५८३ चौ.किमी आहे.

चिमूर विधानसभा मतदारसंघ - ७४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार चिमूर मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील १. चिमूर आणि २. नागभीड ही तालुके आणि ३. ब्रह्मपुरी तालुक्यातील अहेर नवरगांव महसूल मंडळ यांचा समावेश होतो. चिमूर हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.

भारतीय जनता पक्षाचे पक्षाचे किर्तीकुमार ऊर्फ बंटी जितेश भांगडिया हे चिमूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

तर गडचिरोली-चिमूर  हा लोकसभा मतदारसंघ असून  काॅंग्रेस चे डॉ नामदेव किरसाट  हे या मतदारसंघातून निवडणूक आलेले  विद्यमान खासदार आहेत.

म्हणजेच राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांचे तुल्यबळ प्राबल्य असलेल्या या गावाची ही एक केविलवाणी परिस्थिती आम्ही एका कार्यक्रमाचे निमित्ताने नागभीड या गावी गेलो असताना येथील जनता व प्रवासी बांधवांनी विशद केली.

अशा या नागभीड गावात काही वर्षांपूर्वी गावाबाहेर एकप्रशस्त असे  बसस्थानक मुख्य मार्गापासूनदोन किलोमीटर आत डोंगर पायथ्याशी बांधण्यात आले  होते, परंतू प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता पुन्हा एकदा  तात्पुरती सोय करीत बसस्थानक राममंदिराचे समोर महामार्ग रस्त्यावर बसथांबा देऊन सुरू करण्यात आले.तिथे प्राथमिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या मात्र  ही तात्पुरती सोय असल्याने जागेचा शोध सुरू होताअशातच बांधकाम  विभागाच्या विश्राम गृहाची जागा निश्चित करण्यात आली , आणि नवीन बसस्थानकाचे निर्माण कार्यसुरू आहे मात्र त्याठिकाणी आधी स्वच्छतागृहाची सोय  करण्यात आली होती परंतू नवीन शौचालय व मुत्रीघर बांधकाम झाल्या दिवसांपासून आजवर कधिच प्रवाशांना ते सुस्थितीत दिसले नाही की त्याचा योग्य वापर करताआला नाही . आजतर त्याची अशी दयनीय अवस्था आहे की महिला प्रवाशी तर या मुत्रीघराचा वापर करुच शकत नाही  परंतु पुरुषही त्या अतिशय घाण असणाऱ्यास्वच्छतागृहात पाय ठेवायला तयार नाहीत.

याबाबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवासी महासंघ व जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटना विदर्भ प्रांत यांचेकडे केलेल्या तक्रारीवरून  ही बाब पुढे आली आहे.

नागभीड हे स्थान चंद्रपूर, गडचिरोली,व नागपूर , यवतमाळ जिल्हा तसेच आंध्र, छत्तीसगड व महाराष्ट्र राज्य  यांना रेल्वे ने जोडणारे तसेच नागपूर , गोंदिया यांसारख्या मोठ्या बाजारपेठांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे दिवसभर प्रवाशांची येजा  व वर्दळ असते, आणि लांब पल्ल्याच्या गाड्या इथेच थांबतात परिणामी प्रवाशांना याठिकाणी स्वच्छतागृह,शौचालय व मुत्रीघराचा वापर करणेआवश्यक असते.

अशा स्थितीत नागभीड येथील अत्यंत घाणेरड्या स्थितीतील मुत्रीघर व शौचालय बघून वापरण्याचा व आपली प्रकृती बिघडवण्याचा कुणी विचारही करु शकत नाहीत मात्र त्याही स्थितीत त्या घाणेरड्या मुत्रीघराचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.

या मार्गावर प्रवास करणाऱ्या आमदार खासदार वा अन्य राजकीय सामाजिक नेतेमंडळी यांना हा प्रकार दिसून येतचनसेल काय?असा प्रश्न जनतेने उपस्थित केला आहे.स्थानिक नगर प्रशासन व स्थानिक नेतेमंडळी यांचे पर्यंत हीबाब पोहोचतच नसेल काय?

प्रवाशांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या स्थानिक प्रशासन व एसटी महामंडळाच्या ब्रम्हपुरी आगार व्यवस्थापक व चंद्रपूर जिल्हा प्रमुखांनी या समस्येवर तातडीने उपाययोजना करुन नागभीड गावावरुन प्रवास करणाऱ्या शेकडो नव्हे हजारो प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी , प्रवासी महासंघ,व जागृत ग्राहक राजा या ग्राहक संघटनेच्या माध्यमातून  नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी केली आहे.

अती तातडीने यांबाबत निर्णय घेऊन हे स्वच्छतागृह स्वच्छ  करण्यासाठी आणि त्यानंतरही ते स्वच्छ राखण्यात कुचराई होऊ नये याबाबत राज्य परिवहन महामंडळाचे उच्च अधिकारी व मंत्री महोदयांनाही अवगत करण्यात आले आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️



 

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.