मूल तालुक्यातील मुरमाडी व चिखली येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान/पंतप्रधान जनमनशिबिर यशस्वी.

मूल तालुक्यातील मुरमाडी व चिखली येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान/पंतप्रधान जनमन शिबिराचे आयोजन.



मूल दीपक देशपांडे.

तहसील कार्यालय मूल आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांचे मार्फत ग्राम पंचायत मुरमाडी  येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान /पंतप्रधान जनमन योजने अंतर्गत आदिवासी बांधवांकरिता शिबिराचे आयोजन दिनांक १७/०६/२०२५ रोजी करण्यात आले. या शिबिरात गट विकास अधिकारी मूल श्री. बी.एच. राठोड, नायब तहसीलदार मूल श्री प्रवीण चिडे, गृहपाल श्री. प्रशांत फरकाडे (आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मूल), डॉक्टर उराडे आरोग्य विभाग, रेवताताई  मडावी सरपंच ग्रा. प. मुरमाडी, मंडळ अधिकारी श्री. संजय कानकाटे, ग्राम महसूल अधिकारी शंकर पिदूरकर, कु. गोपवार कृषी विभाग, ग्रामसेवक श्री धारणे , श्री मशाखेत्री सेतू केंद्र, पोलीस पाटील, कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा, नरेगा APO, स्वच्छ भारत APO, विस्तार अधिकारी घरकुल विभाग व इतर अधिकारी व कर्मचारी या शिबिरात उपस्थित होते.

शिबिराच्या माध्यमातून शासकीय कार्यालयाच्या सेवा आपल्यापर्यंत पोहचल्या असून आपण जास्तीत जास्त संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री बी एच राठोड गट विकास अधिकारी पं. स. मूल यांनी मुरमाडी येथील जनतेला केले. वैयक्तिक हक्कांची शंभर टक्के पूर्तता करण्याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन नायब तहसीलदार श्री प्रवीण चिडे यांनी केले. गृहपाल प्रशांत फरकाडे यांनी एकात्मिक आदिवासी विकास विभाग चंद्रपूर मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना बाबत माहिती दिली. अश्विनी यंबरवर सिकलसेल विभाग उपजिल्हा रुग्णालय मूल यांनी ग्रामस्थांची सिकलसेल तपासणी केली असता त्यातील ०५ व्यक्ती पॉजिटिव्ह आढळून आले. पावन नागपुरे यांनी LFT, TFT KFT, बी.पी. इत्यादी तपासणी केल्या. सेतू केंद्रा मार्फत जातीचे दाखले, उत्पन्न दाखले काढण्यात आले. ग्रामसेवक श्री धारणे यांनी सूत्रसंचालन केले.  शिबीर यशस्वी करण्याकरिता ग्रामस्थांनी सहकार्य केले

तहसील कार्यालय मूल आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांचे मार्फत ग्राम पंचायत चिखली येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान /पंतप्रधान जनमन योजने अंतर्गत आदिवासी बांधवांकरिता शिबिराचे आयोजन दिनांक १९/०६/२०२५ रोजी करण्यात आले. या शिबिरात नायब तहसीलदार मूल श्री डी. एम. पवार , गृहपाल श्री. प्रशांत फरकाडे (आदिवासी मुलाचे शासकीय वसतिगृह मूल), डॉक्टर आस्मा आरोग्य विभाग चिखली, कडस्कर सरपंच ग्रा. प. चिखली, मंडळ अधिकारी श्री. संजय कानकाटे, पुरवठा निरीक्षक शिरभाते, पंचायत समिती विस्तार अधिकारी खांडरे आणि वानखेडे, सायंकार जे. ई. महावितरण, राऊत जे. ई., शेंडे पी.एच.सी. राजोली, ग्राम महसूल अधिकारी नंदकिशोर परसावार, ग्राम अधिकारी पी. एम. चिमुरकर, श्री मशाखेत्री सेतू केंद्र, शरद भोयर आधार केंद्र, पोलीस पाटील, व इतर अधिकारी व कर्मचारी या शिबिरात उपस्थित होते.

शिबिरात सर्व जनतेनी सहभाग घेऊन आवश्यक कागदपत्रे काढून घ्यावी, विविध योजनांची माहिती घेऊन त्यासाठी अर्ज करावा तसेच आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन श्री डी. एम. पवार नायब तहसीलदार मूल यांनी चिखली येथील जनतेला केले. श्री. शिरभाते पुरवठा निरीक्षक मूल, श्री खांड्रे व श्री वानखेडे यांनी सुद्धा शबरी घरकुल व इतर योजनांची माहिती सांगितली, गृहपाल प्रशांत फरकाडे यांनी एकात्मिक आदिवासी विकास विभाग चंद्रपूर मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना बाबत माहिती दिली. अश्विनी यंबरवर सिकलसेल विभाग उपजिल्हा रुग्णालय मूल यांनी ग्रामस्थांची सिकलसेल तपासणी केली असता त्यातील ०४ व्यक्ती पॉजिटिव्ह आढळून आले. पावन नागपुरे यांनी LFT, TFT KFT तर डॉ. आस्मा शेख यांनी बी.पी. आणि शुगर तपासणी केल्या. सेतू केंद्रा मार्फत आधार कार्ड, जातीचे दाखले, उत्पन्न दाखले काढण्यात आले. ग्राम अधिकारी चिमुरकर यांनी सूत्रसंचालन, प्रास्ताविक नंदकिशोर परसावार यांनी केले. शिबीर यशस्वी करण्याकरिता ग्रामस्थांनी सहकार्य केले.

यानंतरही दिनांक २३/०६/२०२५रोजी मौजा आकापूर येथील जि.प‌.शाळा येथे तर दिनांक २५/०६/२०२५  रोजी जानाळा येथील आदिवासी आश्रमशाळा  येथे आणि २७/०६/२०२५रोजी ग्रामपंचायत कार्यालय भवराळा येथेही अशाच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,या कार्यक्रमाला उपस्थित राहून जनतेने या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका प्रशासनाने समस्त जनतेला केले आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.