मोरवाही या आडवळणाच्या गावाचा वाली कोण?
मोरवाही या आडवळणाच्या गावाचा वाली कोण?
समस्यांची उकल कधी होणार? :- मोरवाही ग्रामस्थ
दीपक देशपांडे
मूल तालुक्यातील मोरवाही हे गाव अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असतांनाच १२-१३किलोमिटरचा फेरा मारुन जावे लागत असल्याने तसेच आजपर्यंत जंगलव्याप्त आणि आडवळणावरील गाव असल्याने प्रगती आणि विकासापासून दूर होते परंतू माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून कोसंबी गावाजवळील उमा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आता ते मूल तालुका स्थानाशी अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असल्याचे लक्षात येते आहे.
आजपर्यंत दुर्लक्षित असलेले हे गाव आजही प्रशासकीय यंत्रणेला प्रगती आणि विकासापासून दूरच ठेवायचे आहे की काय?असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
यांचे पहिले कारण स्पष्ट करताना ग्रामस्थ सांगतात, आजपर्यंत आमचे गाव चिखली साझ्यात होते तेंव्हा तलाठी चिखलीला असायचे परंतू आता नुकताच बेलगाटा साझा झाल्यावर आणि या साझ्यात केवळ बेलगाटा आणि मोरवाही ही दोनच गावे असतानासुद्धा तलाठी कार्यालय बेलगाटा येथे आहे त्याबाबत आमचा आक्षेप नाही परंतू बेलगाटा येथे जाण्यासाठी जंगलातून मार्गक्रमण करीत जावे लागते आणि सध्या वाघांची भिती आणि या परिसरात वावर वाढला असल्याने आठवड्यात किमान दोन दिवस तलाठी मोरवाही गावात उपलब्ध व्हावेत व ग्रामस्थांना त्यांची महसूली कामे आपल्या गावात करता यावीत हा विचार कुणाच्या मनात कधी आला नाही आणि जेव्हा आला व तशी मागणी केली गेली तर मोरवाही गावात नेटवर्क नसल्याने तलाठी इथे उपलब्ध होऊ शकणार नाहीत असे उत्तर मिळाले, जेव्हा की मोरवाही हे गाव आता बारमाही रस्त्याने जोडले गेले आहे व मूल पासून केवळ सहा किलोमीटर अंतरावर आहे तर बेलगाटा हे गाव मूल पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे,एवढेच नव्हे तर मोरवाही येथे तलाठी कार्यालयासाठी जागा सहज उपलब्ध होऊ शकते ही वास्तविकता आहे.
दुसरे कारण स्पष्ट करताना ग्रामस्थ सांगतात,या गावातील मोरवाही माल व मोरवाही चक शिव धुऱ्यावरुन पांदन रस्त्याचे काम मागील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे , लोकांनी अतिक्रमण करून अडवून ठेवले आहे ,ते काम रखडले असल्याने गावातील लोकांना शेतीची कामे करताना अनेक अडचणी येत आहेत, वादविवाद होत आहेत,मात्र प्रशासन याबाबत ठोस निर्णय घेऊन हे पांदन रस्त्याचे काम पूर्ण करण्यात टाळाटाळ करीत आहे.
तिसरी बाब मोरवाही ते चितेगाव रस्त्याचे काम मागील कित्येक वर्षांपासून अर्धवट पडले आहे , परिणामी मोरवाही येथील ग्रामस्थांना दोन किलोमीटर अंतरावरील चितेगावला जाण्यासाठी बेलगाटा मार्गे वळसा घालून पाच किलोमीटर अंतरावरून जावे लागते,या रस्त्याचे अपूर्ण काम केंव्हा पूर्ण होणार? हा प्रश्न मोरवाही येथील ग्रामस्थांनी नव्याने उपस्थित केला आहे.
कारण...
मौजा मोरवाही येथील ग्रामस्थांना घरकुल योजनेतील बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने देऊ केलेल्या पाच ब्रास रेती उपसा पास हे चितेगाव घाटाचे देण्यात आले आहेत.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️



मोरवाडी वासीय जनतेच्या मागण्या रास्त असून प्रशासनाने या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.जय ग्राहक राजा.
ReplyDelete