जागृत ग्राहक राजा मूल ने मुख्याधिकारी संदीप दोडे यांची घेतली भेट.
जागृत ग्राहक राजा मूल ने मुख्याधिकारी संदीप दोडे यांची घेतली भेट.
औपचारिक चर्चेत मान्सून पूर्व कामांचा आढावा.
जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने मूल तालुका पदाधिकारी यांनी नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मूल नगरपरिषद मुख्याधिकारी संदीप दोडे यांची भेट घेतली.
या भेटीत मान्सून पूर्व कामांचा आढावा घेऊन,मूल नगरातील दोन्ही मुख्य रस्ते,१) चंद्रपूर नागपूर मार्ग व २) विश्राम गृह ते सोमनाथ रोडवरील तसेच नगरातील अंतर्गत नाल्यांची सफाई, माता मंदिर रोडवरील नाल्यांचे बांधकाम तातडीने करुन पाणी वाहून जाण्यासाठी योग्य कारवाई करणे ,शहरातील उंचसखल भागातील खड्डे, रस्त्याचे कडेला असलेल्या उंचसखल भागात मुरुम टाकणे , रामपूर येथील नाल्यांची सफाई, पावसाळ्यात रामपूर पर्यंत पोच मार्गावर गिट्टीमुरुम टाकून रस्ता जाण्यायोग्य बनवीणे, बालविकास शाळेमागील महेंद्र करकाडे यांच्या घराजवळ असलेल्या उंचसखल रस्त्याचे समतलीकरण, शहरातील खड्डे बुजविणे,बंद पथदिवे बदलणे, डासांची पैदास थांबविण्यासाठी फाॅगमशीनने फवारणी, सार्वजनिक सोबतच खाजगी विहीरींतही ब्लिचिंग टाकणे, नळांना पाणीपुरवठा सारख्या दबावाने सोडणे,आठवडी बाजारात विक्रेते रस्त्यावर उतरून रहदारीस बाधा आणणार नाहीत यासाठी कर्मचारी नियुक्त करणे व सार्वजनिक जागे (ओपन स्पेस)चे योग्य पद्धतीने संचलन व देखभाल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
नगरपरिषद मूलचे नवनियुक्त आरोग्य अधिकारी शितल हाडके यांना पाचारण करुन त्यांना व्यक्तीश: लक्ष देऊन कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्याधिकारी यांनी दिल्या व हाडके यांनी नगराची माहिती घेऊन प्रत्यक्ष पाहणी करुन आवश्यक कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.
या भेटीत दीपक देशपांडे यांचे सोबत, डॉ आनंदराव कुळे, कार्यकारिणी सदस्य व तुळशीराम बांगरे संघटक जागृत ग्राहक राजा हे प्रामुख्याने उपस्थित होते.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment