पर्यावरण रक्षणाच्या निर्धाराचा🌲जागतिक पर्यावरण दिन
पर्यावरण रक्षणाच्या निर्धाराचा🌲जागतिक पर्यावरण दिन
संकलन:-अभय बक्षी नागपूर आज पर्यावरण दिन. संयुक्त राष्ट्राने १९७३ पासून पर्यावरण जागरुकतेसाठी याचा प्रारंभ केला. १४३ देश यामध्ये सहभागी आहेत. पर्यावरण संरक्षण प्रदूषण मुक्ती हा पृथ्वीवरील आस्थेचा विषय आहे.*
भौतिक सुखासाठी तंत्रज्ञानाने नवनवीन वस्तूंचा शोध लावला. त्याच्या वापराचा अतिरेक सुरु झाला. यापैकी एक म्हणजे प्लास्टिक. जमिनीत.. समुद्रातही हे प्लास्टिक नष्ट होत नसल्याने त्याच्या दुष्परिणामाने जगाला वेठीस धरलेय. मनुष्य प्राणी जलचर सगळ्यांचे आरोग्य धोक्यात आलेय. शुद्ध हवा पाणी पण मिळण अशक्य झाले. या वाढत्या समस्यांनी जग हैराण झालेय. या समस्या सोडवायला जग एक झालेय.
जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषण संपवण्यासाठी पर्यावरणीय कृती, शाश्वत उत्पादन आणि वापर, समुद्र आणि महासागरांचे संरक्षण, जैवविविधता टिकवून ठेवणे यासह शाश्वत विकास, प्लास्टिक प्रदूषणापासून मुक्तता हे यंदाचे ध्येय आहे.
यासाठी यावर्षी प्रजासत्ताक कोरिया यजमान पद भूषविणार आहे. जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषण संपवण्यावर लक्ष केंद्रित करून कोरिया प्रजासत्ताक साल २०२५ मध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन करणार आहे.
भारतात प्लास्टिक प्रदूषण मुक्ती साठी बरेच प्रयत्न सुरु आहेत. रिसायकल केल्या जात आहे. त्याचा योग्य वापर हा रस्ते बांधतानाही होत आहे. प्लास्टिक पिशव्यावर बंदी आहे. लोकांचा कापडी पिशव्यांचा वापर वाढलाय. प्लास्टिक किमान वापर करण्यासाठी उपाय शोधले जात आहेत.
*पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।*
*तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः"*
ही तर आमची श्रद्धेने परमेश्वर पूजनाची पद्धती. वृक्ष, डोंगर, नदी.. समुद्र एवढेच काय तर, जल हे तीर्थ मानणारी ही भारतीय संस्कृती. जीवन देणाऱ्या निसर्गा विषयीचा आमचा हा श्रद्धाभाव अगदी वेद कालापासून आहे. जगतगुरु संत तुकाराम महाराज म्हणतात.. "वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें.."
मानवाच्या पहिल्या श्वासापासून जन्मभरच नाही तर जीवनाचा अंत झाला तरीही पर्यावरणाचे भान आम्ही राखतो. असे महत्त्व जाणणारा भारत हा एकमेव देश.
भारत सुजलाम सुफलाम राखताना पर्यावरण समतोलासाठी मृदा.. जल.. खनिज आणि उर्जा व्यवस्थापन सातत्याने करतोय. अपारंपारिक ऊर्जेचा नित्य जीवनात वापर वाढवलाय. यामध्ये प्रदूषणाचे भान राखून पर्यावरणपूरक शेती उत्पादनातील इंधनाचे प्रयोग यशस्वी केलेत.
जलविद्युत.. पवन उर्जा.. सौर उर्जा वापर वाढवलाय. निर्मल जलासाठी नदी संवर्धन सुरू आहे. अभ्यासक्रमात पर्यावरण विषय समाविष्ट केलाय. लोक सहभागाने पर्यावरण बचाव चळवळ यशस्वी होत आहे.
पर्यावरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन पवित्र.. उदात्त.. निरपेक्ष आणि विशाल आहे. आमचेच नाही तर जगाचे हित बघतो. आमचे पर्यावरण धोरणाचे ध्येय हेच आहे की..
*सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया,*
*सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुख भागभवेत ।*
यासाठी आम्ही वृक्ष लागवड.. संवर्धन करून शुद्ध हवा.. जल नेणाऱ्या हिरव्या निसर्ग सहवासात राहतो आणि असे गाणे गात त्याचा निर्भळ आनंद लुटतो.
*जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !!*
*हिरवा निसर्ग हा भवतीने*
*जीवन सफर करा मस्तीने*
*मन सरगम छेडा रे*
*जीवनाचे गीत गा रे,*
*गीत गा रे धूंद व्हा रे*
*नवे पंख पसरा,*
*उंच उंच लहरा*
*भिरभिरणारे गीत गा रे,*
*गीत गा रे धूंद व्हा रे*
*गुलाबी हवा*
*अशी मंद मंद वाहते*
*शराबी कळी*
*अशी चिंब चिंब नाहते*
*सुगंधी फुलांना नशा आज आली*
*सडा शिंपिला हा जणू प्रीतीने*
*नव्या संगितातले तराणे नवे असे*
*कुणी सोबती मला*
*मिळाया हवे असे*
*जन्म हे जगावे, विश्व हे बघावे*
*एकरुप व्हावे संगसाथीने*
०५.०६.२०२५
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment