कृषि महाविद्यालय मूल येथे माती परीक्षण प्रयोगशाळेची स्थापना

 कृषि महाविद्यालय मूल येथे माती परीक्षण प्रयोगशाळेची स्थापना.

मूल (चंद्रपूर) :दीपक देशपांडे

कृषी महाविद्यालय, मूल येथे महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. विष्णुकांत टेकाळे यांच्या हस्ते २८ मे २०२५ रोजी  माती परीक्षण प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. विष्णुकांत टेकाळे म्हणाले, या भागातील शेतकऱ्यांच्या माती परीक्षणाची व्यवस्था उपलब्ध झाल्यामुळे त्यांना जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण तपसता येईल, रासायनिक खतांचा संतुलित वापर करता येईल, जमिनेचे आरोग्य व सुपीकता राखता येईल व *खतांच्या संतुलित वापरणे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन होणाऱ्या अतिरिक्त खर्चास आळा घालण्यास*  नक्कीच मदत होईल. पुढे बोलताना ते म्हणाले विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणापुरतेच न मर्यादित राहता आपले कर्तव्य म्हणुन शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष मदतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे व हे युनिट भविष्यात शेतकऱ्यांसाठी मोलाचे कार्य करेल असे सांगितले. या प्रयोगशाळेच्या  माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचे वैज्ञानिक पद्धतीने परीक्षण करून देण्यात येणार असून, त्यामुळे पीक उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.

          या उपक्रमासाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून मातीतील *सामू, विद्युत चालाकता, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश, गंधक तथा सूक्ष्म अन्नद्रव्यांची* तपासणी करण्याची येथे सोय उपलब्ध आहे. सद्यस्थितीत प्रायोगिक तत्वांवर हि प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी या महाविद्यालयात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीच्या मृदाचे नमुने प्रयोगशाळेस आणल्यास मृदा आरोग्य पत्रिकेद्वारे त्यांना सविस्तर अहवाल मिळणार असून त्याद्वारे त्यांना योग्य खत व्यवस्थापन करता येणार आहे. या भागात शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणा बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी *शेतकरी शास्त्रज्ञ मंचातील चिचाळा* या गावातील काही सदस्य शेतकऱ्यांचे मातीचे नमुने मोफत तपासून देण्याचे या महाविद्यालयाने ठरवले आहे. 

या प्रयोगशाळेमुळे कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माती परीक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांना संशोधन, प्रयोग व शेतकर्यांशी संवाद साधण्याची संधी त्यांना उपलब्ध होईल. सदर प्रयोगशाळेच्या स्थापनेचे श्रेय मा. सहयोगी अधिष्ठाता यांनी महाविद्यालयातील *मृदा शास्त्रज्ञ डॉ. अक्षय इंगोले व श्री. नागेश नवघरे* यांना दिले व हि प्रयोग शाळा विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.