जागो ग्राहक जागो:- ग्राहक राजा जागा हो, शोषणमुक्त समाज रचनेचा धागा हो.
जागो ग्राहक जागो:-
ग्राहक राजा जागा हो, शोषणमुक्त समाज रचनेचा धागा हो....१.
पेट्रोल पंपावर सुविधा
दीपक देशपांडे , अध्यक्ष, जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत.
पेट्रोल पंपावर ग्राहकांना काही मोफत (फ्री) सुविधा दिल्या जातात. त्या खालीलप्रमाणे असतात:-
१. टॉयलेट (शौचालय) सुविधा
सार्वजनिक वापरासाठी स्वच्छतागृह मोफत उपलब्ध असणे बंधनकारक आहे,हे स्वच्छतागृह कुलूप लावून बंद ठेवता येत नाही.
२. पिण्याचे पाणी
स्वच्छ पिण्याचे पाणी मोफत दिले जाणे आवश्यक आहे.
३. एअर (हवा भरणे / टायर प्रेशर तपासणे)
वाहनांच्या टायरसाठी हवा भरण्याची सुविधा मोफत असावी लागते. (बऱ्याच वेळा काही लोक पैसे मागतात, पण हे नियमबाह्य आहे. काही पेट्रोल पंपावर केवळ हवा भरण्यासाठी सोय केली असल्याचा दिखावा केला जातो. हेही नियमबाह्य आहे.
४. प्राथमिक वैद्यकीय सुविधा (First Aid Box)
प्राथमिक उपचारासाठी फर्स्ट एड बॉक्स प्रत्येक पेट्रोल पंपावर उपलब्ध असणे गरजेचे आहे.
५. मूलभूत माहिती फलक (Display Boards)
दररोजचे इंधन दर, मोजमाप यंत्राची माहिती, व ग्राहक तक्रार क्रमांक इत्यादी फ्री माहिती मिळते,व ती उपलब्ध करून देणे पेट्रोल पंप चालकांना बंधनकारक व अत्यावश्यक आहे.
६. ग्राहक तक्रार नोंदवही / हेल्पलाइन नंबर
तक्रारीसाठी हेल्पलाइन व तक्रार वही उपलब्ध असते, एखाद्या ग्राहकाने मागणी केली की ती विनातक्रार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
७. बिल (Receipt)
इंधन भरल्यानंतर बिल मागितल्यास ते मोफत दिले जाते. बिल देणे बंधनकारक आहे
८. आरामासाठी आसन / छायादार जागा
काही मोठ्या पंपांवर प्रवाशांसाठी आसन व विश्रांतीसाठी छायादार जागा असणे आवश्यक आहे.
९.पेट्रोल भरताना मिटर डिस्प्लेवर "०" करुनच पेट्रोल भरणे आवश्यक आहे.
जर या सुविधांपैकी काहीही दिल्या जात नसतील तर तुम्ही संबंधित तेल कंपनीकडे तक्रार करू शकता मग तो पेट्रोल पंप (HP, BPCL, IOCL) कोणत्याही कंपनीचा असो.
जनतेने या अधिकाराचा वापर करून संबंधित पेट्रोल पंपावर या सुविधा मिळत नसल्यास तक्रार करायला पुढे आलेच पाहिजे. व आपली होणारी फसवणूक टाळण्यासाठी सजग होण्याची आवश्यकता आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment