दुसरी तक्रार:-मामाने चक्क भाच्यालाच गंडविले?
दुसरी तक्रार -मामाने चक्क भाच्यालाच गंडविले.
मूल,दीपक देशपांडे
नगरपरिषद मूल मध्ये नौकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लुबाडणूक केल्याबाबत एक तक्रार दाखल होताच उशिरा का होईना चौकशी सुरू होताच आज १६/०६/२०२५रोजी दुसरी तक्रार दाखल झालीआहे.
आज दाखल झालेली तक्रार तर चक्क एका मामाने आपल्या भाच्याला गंडविले असल्याचे दर्शवित असून नगरपरिषद मध्ये कार्यरत या शकुनी मामाने अजून किती जणांना "मामा" बनविले आहे याबाबत मूल नगरीत खमंग चर्चा सुरू झाली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल महाजन वार नामक भाच्याने नगरपरिषद मूल मध्ये बाबूगिरी करणाऱ्या राजू पुद्दटवार नामक मामाने चक्क साडेसहा लाखांचे गंडविल्याची तक्रार मूल पोलिस ठाण्यात आज दिनांक १६/०६/२०२५रोजी दाखल केली असून या तक्रारीत सविस्तर घटनाक्रम सांगितला आहे आणि मामाचा साथीदार मंत्रालयातील सहकारी वडाले साहेब असल्याचे भासविणाऱ्या मूलमधील प्रशांत उर्फ नाना आक्केवार या नावाचा उल्लेखही केला आहे.
त्यामुळे हे प्रकरण आणखी कोणते वळण घेणार याबाबत नगरांत उलटसुलट चर्चा सुरू झाली असून पोलिस नेमकी चौकशी चक्रं कशी फिरवतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून त्यांतील आरोपी राजू आणि नाना मूलमधून फरार झाले असल्याची व त्यांनी प्रचंड माया जमवली असल्याची चर्चा सुरू आहे.
आता या दोघांनाही शोधून सत्य किती दिवसात पुढे येईल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.आणि या प्रकरणी अजून किती छोटे मोठे मासे गळाला लागणार याबाबत साशंकता निर्माण झाली आहे आणि पोलिस यंत्रणा यांचा तपास किती वेगाने करेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment