कृतज्ञता वडिलांविषयी आज जागतिक पितृदिन.
कृतज्ञता वडिलांविषयी
आज जागतिक पितृदिन
*पिता स्वर्गः पिता धर्मः*
*पिता परमकं तपः ।*
*पितरि प्रीतिमापन्ने सर्वाः*
*प्रीयन्ति देवताः ॥*
*माझे वडील माझ्यासाठी स्वर्ग आहेत. माझ्या वडिलांचे संस्कार, आज्ञापालन हाच माझा धर्म आहे. त्यांना सुखी ठेवणे हीच माझ्या जीवनाची तपस्या आहे. माझे वडिल जेव्हा आनंदी होतात तेव्हा सगळ्या देवताही आनंदी होतात.*
*भारतीय संस्कृतीत वडीलांवीषयीचा हा पुण्य भाव. अगदी पित्याचा देव म्हणून सन्मान होतो. वडील म्हणजे आमचे जगातील सर्वात मोठे आदर स्थान. त्यांच्यामुळेच जगात आमचे अस्तित्व.. ओळख असते. त्यांच्या छत्रछायेखाली आम्ही निर्धास्त जीवन जगतो.*
*वडील म्हणजे आभाळमाया. त्यांच्या मायेची जागा इतर कुणीही घेवूच शकत नाही. ते कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जन्मभर अपार कष्ट.. संघर्ष करतात. यावेळी त्यांना जगाचे कडू गोड अनुभव येतात. पण वाईट अनुभवाची जाणीव कधी कुटुंबाला करुन देत नाहीत. जन्मभर कुटुंबासाठी त्याग हेच त्यांचे जीवन उद्दिष्ट असते. वडील अशी अदृश्य छत्रछाया की जिच्या छायेत आम्ही आजन्म सुरक्षित असतो.*
*वडील आपल्या भावना उघडपणे प्रकट करत नाहीत. ना दुःख ना आनंद. हे आगळे सामर्थ्य त्यांच्याकडे असते. पण आज काळ बदललाय. स्वतःच्या पोटाची नाही तर मुलांच्या भविष्याची चिंता जास्त आहे. नित्य वाढत चाललेला शिक्षण खर्च.. प्रवेशाच्या कटकटी.. बाह्य जगातील फसवणूक.. जिवघेण्या घटना यामुळे वडीलांच्या चिंतेत भर पडतेय.*
*मुलांच्या भविष्यासाठी वडील अहोरात्र कष्ट उपसत आहेत. या धावपळीत मग मुलांवरची माया व्यक्त करायला.. लाड करायला.. एवढेच काय तर रागवायलाही वेळ मिळत नाही. या सुप्त भावना व्यक्त न झाल्याने जीव गुदमरतो.*
*मुलींवर तर वडिलांचे विशेष प्रेम असते. काळजीही जास्तच असते. ही लाडकी लेक एकदिवस परक्या घरी जाणार याची त्यांना जाणीव असते.*
*मुलीचे लग्न हा वडीलांच्या जीवनात सर्वोच्च आनंद क्षण. पण वडीलांच्या कष्टाची.. अपरंपार मायेची जाणीव मुलीला तिचे हक्काचे घर सोडताना असेल का.. त्यांच्यासाठी चार आसवे ओघळतील का.. या भावना व्यक्त करणारे हे कष्टकरी वडीलांचे स्वगत.*
*आज पितृदिन. वडीलांनी आमच्यासाठी केलेल्या कष्टाची आम्हांला जाणीव आहे. सदैव कृतज्ञभाव आहे. या विशाल जगात समर्थपणे जगण्यासाठी आम्हाला पायावर उभे करणाऱ्या वडीलांना साष्टांग दंडवत.*
🌹🔆🥀👴🏻❣👴🏻🥀🔆🌹
*कोमेजून निजलेली*
*एक परीराणी*
*उतरलेले तोंड,*
*डोळा सुकलेले पाणी*
*रोजचेच आहे सारे*
*काही आज नाही*
*माफी कशी मागू पोरी*
*मला तोंड नाही*
*झोपेतच घेतो तुला*
*आज मी कुशीत*
*निजेतच तरी पण*
*येशील खुशीत*
*सांगायाची आहे माझ्या*
*सानुल्या फुला*
*दमलेल्या बाबाची ही*
*कहाणी तुला !*
*.*
*.*
*.*
*बोळक्यामध्ये लुकलुकलेला*
*तुझा पहिला दात*
*आणि पहिल्यांदाच घेतलास*
*जेव्हा तोंडी मऊ भात*
*आई म्हणण्याआधी सुद्धा*
*म्हणली होतीस बाबा*
*रांगत रांगत घेतलास*
*जेव्हा घराचा तू ताबा*
*लुटूलुटू उभं राहत*
*टाकलंस पाऊल पहिलं*
*दूरचं पहात राहिलो फक्त,*
*जवळ पहायचंच राहिलं*
*असा गेलो आहे*
*बाळा पुरा अडकून*
*हल्ली तुला झोपेतच*
*पाहतो दुरून*
*असा कसा बाबा देव*
*लेकराला देतो*
*लवकर जातो आणि*
*उशिरानं येतो*
*बालपण गेले तुझे गुज निसटून*
*उरे काय तुझ्या-माझ्या*
*ओंजळी मधून*
*जरी येते ओठी तुझ्या*
*माझ्यासाठी हसे*
*नजरेत तुझ्या काही*
*अनोळखी दिसे*
*तुझ्या जगातून बाबा*
*हरवेल का ग ?*
*मोठेपणी बाबा तुला*
*आठवेल का ग ?*
*सासुराला जाता-जाता*
*उंबरठ्यामध्ये*
*बाबासाठी येईल का*
*पाणी डोळ्यांमध्ये ?
*🌹🙏🌹*
१५.०६.२०२५
संकलन:-अभय बक्षी, नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment