ब्रेकिंग न्यूज:- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक

ब्रेकिंग न्यूज.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक 

संतोष रावत सह पाच अविरोध?



मूल, दीपक देशपांडे 

 चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या होऊ घातलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत तालुका निहाय अ गटामधुन बँकेचे विद्यमान अध्यक्ष  मा. संतोषसिंह रावत यांचेसह चार उमेदवार अविरोध? विजयी होण्याची शक्यता बळावली आहे.आज नामांकन अर्ज छाननी पूर्ण झाल्यानंतर तशी अधिकृत घोषणा होईल.

मूल तालुक्यात- संतोषसिंह रावत, सावली तालुका- संदीप गड्डमवार, भद्रावती तालुका- रविंद्र शिंदे, चिमुर तालुका- संजय डोंगरे आणि बल्लारपुर तालुका- डाँ. अनिल वाढई हेच ते पाच नवनिर्वाचित संचालक ठरणार आहेत.

मागील काही वर्षांपासून मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या आणि याबाबत बराच वादंग पेटला असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ही निवड प्रक्रिया सुरू असून त्याचाच हा एक परिपाक असून काल नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा शेवटचा दिवस होता.

यांच्या अविरोध निवडीबद्दल संपूर्ण जिल्ह्यात एक आनंदाची लाट आली असून कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.