ब्रेकिंग न्यूज :- मूल न.प. भरतीच्या नावाने आगळे वेगळे घोटाळा प्रकरण ,आता कोणते वळण घेणार?

 ब्रेकिंग न्यूज.

मूल  न.प. भरतीच्या नावाने  आगळे वेगळे घोटाळा प्रकरण ,आता कोणते वळण घेणार?

जागा निघाल्या असून नौकरी लावून देण्याचे आश्वासन देत झाली लाखोंची उलाढाल.

तक्रारीवर कार्यवाही केंव्हा?

मूल, दीपक देशपांडे 

मागील काही दिवसांपासून मूल शहर , तालुका व जिल्हास्तरावर चर्चेत असलेल्या मूल नगर परिषद नौकरभरतीच्या नावाने आगळे वेगळे घोटाळा प्रकरणी शेवटी काल दिनांक १०/०६/२०२५ रोजी मूल पोलिस ठाण्यात एक तक्रार दाखल झाल्याची खात्रीशीर बातमी हाती आली आहे.

सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार तक्रारकर्त्याने  ज्यांनी हे गैरव्यवहार केले त्यांच्या नावासह तक्रार केली असून हा गैरव्यवहार कसा व कोठे झाला याबाबत तारीख वार तपशीलही या तक्रारीत नमूद केला आहे.

ह्याबाबत आधी फक्त चर्चा होती परंतू मूल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी एक "प्रेस नोट" प्रसिद्धीला दिल्याने हे प्रकरण पुढे आले व चर्चा सुरू झाली,मात्र कुणी तक्रार करायला पुढे येत नसल्याने हे प्रकरण निव्वळ एक हवा बनून तशीच हवेत विरून जाते की काय अशी चर्चा सुरू झाली.

आता मात्र तक्रार दाखल झाली असल्यामुळे या तक्रारीची दखल घेत मूलचे प्रभारी ठाणेदार कोणती कारवाई करतात ? की वरीष्ठांच्या मार्गदर्शनात दुसऱ्या कोणत्या  वरीष्ठ अधिकारी यांचे कडे चौकशी सोपवली जाते  की राजकीय दबावामुळे चौकशीविनाच ती दबून जाईल याकडे जनतेचे लक्ष लागले असून ,या एका तक्रारीच्या पाठोपाठ अजूनही काही तक्रारी दाखल होऊ शकतील अशीही खात्रीशीर बातमी आमच्या सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

आजवर केवळ चर्चेत असलेल्या या विषयावर पोलिस विभाग कशी सुत्रे हालवतात व या सर्व प्रकरणात काय काय सत्य बाहेर येईल याबाबत जनतेत उत्सुकता असून असे व्यवहार कसे केले गेलेत आणि हे व्यवहार करताना  त्या नगरपरिषद कर्मचाऱ्याला थोडीही भिती वाटली नसेल काय? की या प्रकरणी  अजून कोणते मोठे मासे गळाला लागणार अशीही चर्चा सुरू असून या सर्व प्रकरणात अजून पडद्याआड कोण कोण आहेत? याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी मूल ची जनता करीत आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.